शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Pramod Kondhare: ‘आमच्या पक्षाचा का असेना, कोंढरेवर कठोरात कठोर कारवाई व्हावी’ चित्रा वाघ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 21:10 IST

भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आमच्या पक्षाच्या का असेना पण कोंढरे याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून घराचा आहेर दिला आहे.

पुणे : भाजपचे पुणे शहर सरचिटणीस प्रमोद काेंढरे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कोंढेरे यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सगळ्या पदातून मुक्त करा, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिला असून तो स्वीकारण्यात आल्याचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.

तर भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आमच्या पक्षाच्या का असेना पण कोंढरे याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून घराचा आहेर दिला आहे. भाजप पदाधिकाऱ्याचा माज उतरवू, अशी टीका शिवसेनेच्या शिंदे गटाने केली आहे. काँग्रेसने या घटनेचा निषेध केला असून नालायक भाजपा व पोलिस प्रशासनाविरुद्ध गणपती बाप्पालाच निवेदन देण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शनिवारवाड्याजवळ कार्यक्रमाच्या वेळी हा सर्व प्रकार घडला. प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, प्रमोद कोंढेरे यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मला सगळ्या पदातून मुक्त करा, अशी मागणी करून शहर सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा आम्ही स्वीकारला आहे. या सगळ्या प्रकरणी पोलीस प्रशासन योग्य ती चौकशी करेल. चौकशीच्या नंतर जे काही निष्कर्ष निघतील. त्या निष्कर्षानंतर भाजप योग्य ती कारवाई करेल. या कार्यक्रमाला मी नव्हतो. मात्र तिथे गर्दी होती त्यामुळे अनवधानाने हे घडलं आहे का याची माहिती घ्यावी लागेल, असेही घाटे यांनी सांगितले. 

कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार, चित्रा वाघ यांचा घरचा आहेर

भाजप हा संविधान, कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत, महिला सशक्ततेविरुद्ध मग तो आमच्या पक्षाचा का असेना वागणाऱ्याला कधीही माफ केले जाणार नाही. प्रमोद काेंढरे याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यासाठी पाठपुरावा करणार आहे, अशा शब्दात भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी घरचा आहेर दिला आहे.

भाजपा पदाधिकाऱ्याचा माज उतरवू

भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांचा तीव्र निषेध आम्ही करीत असून, कोंढरे यांना आलेला सत्तेचा माज आम्ही निश्चित उतरवू, अशी टीका शिवसेनेच्या शिंदे गटाचे महानगरप्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे त्याचे आम्हाला भान आहे. यापूर्वी देखील कोंढरे याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली नागवडे यांचाही विनयभंग केला होता आणि त्याचा गुन्हा ही नोंदवण्यात आला आहे. स्त्रीलंपट प्रमोद कोंढरेसारख्या पदाधिकाऱ्याला, मित्रपक्ष भाजपने पक्षातून त्वरित काढून टाकावे, अशी मागणीही धंगेकर यांनी केली.

नालायक भाजपा, पोलिस प्रशासनाविरुद्ध गणपती बाप्पालाच निवेदन देणार

भाजप पदाधिकारी ओंकार कदम याने महापालिकेतील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करून धमकी दिली होती. त्यावेळी ही पोलिस प्रशासनाने फक्त तोंडदेखली कार्यवाही केली होती. भाजपचे पदाधिकारी प्रमोद काेंढरे याने महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केला आहे. त्यामुळे शहर काँग्रेसच्या वतीने येथे गुरुवारी नालायक भाजपा आणि पोलिस प्रशासनाविरुद्ध गणपती बाप्पालाच निवेदन देण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड