शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

Mahavitaran: बारामतीत वीजचोरांचा सुळसुळाट; तब्बल २,४३१ जणांवर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 2:51 PM

पुणे : महावितरणने वीज चोर आकडेबहाद्दरांवर कारवाई तीव्र स्वरूपात व कठोरपणे सुरू केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३,०२१, ...

पुणे : महावितरणनेवीज चोर आकडेबहाद्दरांवर कारवाई तीव्र स्वरूपात व कठोरपणे सुरू केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ३,०२१, तर त्याखालोखाल बारामती ग्रामीण मंडलमध्ये २,४३१ वीज चोर आकडेबहाद्दरांवर कारवाई केली आहे, तर सातारा जिल्हा ७०३, पुणे जिल्ह्यांतर्गत पुणे ग्रामीण, गणेशखिंड, रास्तापेठ मंडलमध्ये ५७३, सांगली ४५७, तर कोल्हापूर ३५ आकडे आढळून आले. महावितरणच्या पथकाने ताबडतोब हे आकडे काढून टाकले आहेत, तसेच ही कारवाई अधिक तीव्रपणे करण्याचे आदेश पथकांना दिले आहेत.

वीजचोरीचे बहुतांश आकडे हे कृषी वापरासाठी असल्याचे दिसून आले. या कारवाईमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा होणे, वीजवाहिनी किंवा रोहित्र अतिभारित होणे, रोहित्रामध्ये बिघाड होणे, विद्युत अपघात आदी प्रकार टाळले जात आहेत. सध्या उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याने विजेच्या मागणीतदेखील मोठी वाढ झाली आहे. मागणीप्रमाणे विजेचा पुरवठा करण्यासाठी हे अनधिकृत आकडे अडथळे ठरत असल्याने वीजचोरीविरुद्ध ही विशेष मोहीम सुरू केली आहे. चार दिवसांमध्ये ७ हजार २२० ठिकाणी अनधिकृत आकडे टाकून वीजचोरी सुरू असल्याचे दिसून आले. हे आकडे तात्काळ काढून टाकण्यासोबतच त्यासाठी वापरलेले केबल, पंप, स्टार्टर व इतर साहित्य जप्त केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाईसह विशेष एकदिवसीय मोहीम सुरू केली आहे. या विशेष मोहिमांमध्ये आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ६ हजार ४२८ ठिकाणी ७ कोटी ७१ लाख ४५ हजार रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचा पर्दाफाश केला आहे. इतर ठिकाणांहून आकडे किंवा केबल टाकून चोरीद्वारे वीजवापर करताना स्वतःच्या, घरातील लहान- मोठ्या व्यक्तीच्या किंवा परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. वीजचोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

''गेल्या चार दिवसांमध्ये महावितरणने वीजचोरी करणाऱ्या आकडेबहाद्दरांविरुद्ध विशेष मोहिमेद्वारे कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अनधिकृत वीजजोडणीची ७ हजार २२० आकडे काढून टाकली. वापरलेले पंप, केबल व स्टार्टर आदी साहित्यदेखील जप्त करण्यात आले आहे. आकडेमुक्त वीज वाहिन्यांसाठी ही कारवाई यापुढेही कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे असे अंकुश नाळे (प्रादेशिक संचालक (प्र.) महावितरण) यांनी सांगितले.'' 

टॅग्स :BaramatiबारामतीmahavitaranमहावितरणelectricityवीजMONEYपैसाEmployeeकर्मचारी