शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Pune Heavy Rain: मुसळधार पावसाचा फटका वीजयंत्रणेला; ८५ हजार नागरिकांच्या घरात अंधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 14:51 IST

महावितरणकडून वीजयंत्रणेत बिघाड झालेल्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यास युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह प्रामुख्याने मुळशी, मावळ, खेड तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे वीजयंत्रणेला मोठा फटका बसला आहे. पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील सोसायट्यांमधील वीजयंत्रणा पाण्यात बुडाल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून १३ वीजवाहिन्यांसह ६९९ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. परिणामी विविध भागांतील सुमारे ८४ हजार ६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

महावितरणकडून वीजयंत्रणेत बिघाड झालेल्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यास युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. गुरुवारी (दि. २५) दुपारी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू असल्याने दुरुस्ती कामात मोठे अडथळे येत होते. तसेच पाण्यात असलेली वीजयंत्रणा तसेच सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद ठेवलेल्या सोसायट्या किंवा परिसरातील वीजपुरवठा पाण्याचा निचरा झाल्यानंतर व पाहणी करून सुरू करण्यात येणार आहे.

खडकवासला धरणातून सोडलेले पाणी प्रामुख्याने सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, पूजापार्क, गायत्री अपार्टमेंट, जलतरंग अपार्टमेंट, राधाकृष्ण रेसिडेन्सी, कुदळे पाटील, द्वारका अपार्टमेंट, आनंद पार्क, स्काय अपार्टमेंट, साई अपार्टमेंट, सिद्धी अपार्टमेंट, जलपूजन अपार्टमेंट, श्यामसुंदर अपार्टमेंट आदींसह हिंगणे, किरकटवाडी, स्वारगेट, धायरी, वडगाव, नवी पेठ आदी भागातील सुमारे ३८ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यासोबतच शहरातील वडगाव शेरी, नगररोड, विश्रांतवाडी परिसरातील १७ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.

शिवाजीनगरमध्ये चव्हाणनगर, बालाजीमंदिर, बिवर्ली हिल्स, वाकडेवाडी परिसर, शिंदे गार्डन, अयोध्यानगरी, सिंध सोसायटी, खडकीमधील राजीव गांधीनगर व परिसर, रास्तापेठ, भवानीनगर, जुनाबाजार, मेलवानी कम्पाउंड, मनीष पार्क सोसायटी, कोंढवा, पिसोळीरोड, खडी मशीन चौक, वानवडी, वारजे, कर्वेनगर आदी भागांतील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच काही भागांत झाडाच्या फांद्या व फिडर पिलरमध्ये पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. तो पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. निगडी येथील घरकूल व ओटा स्कीमचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. तसेच सेक्टर चारमधील मातोश्रीनगर, रावेत येथील नदीकाठचा परिसर, सांगवी, हिंजवडी, दापोडी, खराळवाडी आदी भागांतील सुमारे ५५ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला.

मुळशी तालुक्यात ३० ते ४० वीजखांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे १०५ रोहित्रांवरील १० ते १२ गावांचा व सुमारे २६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यासोबतच मुळा नदीकाठच्या परिसरात भुकूम, भुगाव, माण व मारुंजी गावांतील २९ वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला. आळंदी शहरात इंद्रायणी नदीचे पाणी शिरल्याने दोन रोहित्रांचा तसेच वडगाव शिंदे गावाचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. पाईट येथे दोन वीजखांब पडल्याने दोन गावांचा तसेच कामशेत, लोणावळा, कार्ला, वडगाव, तळेगाव परिसरातील १८ ते १९ गावांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. पाण्याचा धोका कमी झाल्यानंतर या गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

महावितरण ‘हाय अलर्ट’वर

पुणे परिमंडल अंतर्गत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे सुरळीत वीजसेवा व वीज सुरक्षेसाठी महावितरण ‘हार्य अलर्ट’वर आहे. मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी पहाटेपासूनच दर तासाला वीजपुरवठ्याचा आढावा घेण्यास सुरवात केली. सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी सतर्क व ऑनफिल्डर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पवार यांनी हिंगणे, डेक्कन, विश्रांतवाडी आदी परिसरांत विविध ठिकाणी भेटी देऊन वीजयंत्रणेची पाहणी केली. तसेच वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांबाबत निर्देश दिले. अतिवृष्टी व पुराच्या प्रतिकूल परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या सेवेची दैना शहरात बुधवारी मध्यरात्रीपासून अनेक भागांत अनेक तास लाखो नागरिक अंधारात बसल्यामुळे महावितरणच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. महापालिका तसेच महावितरण या दोन्हीही यंत्रणा सर्व दोष पावसावर ढकलून मोकळे होत आहेत. मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये काय दर्जाची झाली आहे, याचा आरसाच या अंधाराने दाखवून दिला आहे. पुणे हे महावितरणला राज्यातले सगळ्यात जास्त महसूल देणारे आणि नगण्य वीजचोरी असणारे शहर असूनही याचे फळ पुणेकरांना काय मिळतेय ते दिसत आहे. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणelectricityवीजWaterपाणीRainपाऊसHomeसुंदर गृहनियोजन