शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

PIFF:‘बिट्वीन टू डॉन्स’ला प्रभात आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार; संत तुकाराम उत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कारावर ‘पोटरा’ ची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 13:50 IST

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर सलमान नाकर दिग्दर्शित ’बिट्वीन टू डॉन्स' या चित्रपटाने नाव कोरले तर ५ लाख रुपयांचा ‘संत तुकाराम उत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार’ शंकर धोत्रे दिग्दर्शित ‘पोटरा’ने पटकाविला

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाच्या १० लाख रुपयांच्या  ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर सलमान नाकर दिग्दर्शित ’बिट्वीन टू डॉन्स' या चित्रपटाने नाव कोरले तर ५ लाख रुपयांचा ‘संत तुकाराम उत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार’ शंकर धोत्रे दिग्दर्शित ‘पोटरा’ने पटकाविला. गेल्या आठवडाभरापासून पुण्यात रसिकांना देशविदेशातील चित्रपटांची पर्वणी देणा-या ’पिफ २०२२’ चा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील पटकथाकार रुमी जाफरी आणि पिफ'चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पार पडला.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार निखिल महाजन यांना  ‘गोदावरी' या चित्रपटासाठी तसेच उत्कृष्ट पटकथा पुरस्कार ‘पोटरा’ या चित्रपटासाठी शंकर अर्जुन धोत्रे यांना मिळाला. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार ‘निवास' या चित्रपटासाठी रमेश भोसले आणि शमीन कुलकर्णी यांना ‘गोदावरी’  या चित्रपटासाठी विभागून देण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार छकुली देवकर हिला ‘पोटरा' या चित्रपटासाठीतर उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘दिलीप प्रभावळकर’ यांना ‘आता वेळ झाली' या चित्रपटासाठी मिळाला. संगीताचा विशेष ज्युरी पुरस्कार ‘गोदावरी'साठी ए. व्ही. प्रफुल्लचंद्र  यांना पटकाविला.

उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक पुरस्कार ‘१०७ मदर्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पीटर केरकेस यांना मिळाला. हा चित्रपट युक्रेनमध्ये चित्रित करण्यात आला आहे. पीटर यांनी ऑनलाईन प्रतिक्रिया देताना युक्रेनियन टीमची आठवण काढली आणि त्यांच्या टीमपैकी काहीजण कीव्हमध्ये बॉम्ब वर्षावाचा सामना करीत असल्याचे सांगितले. एमआयटी ह्युमन स्पिरिट पुरस्कार अलेक्सी जर्मन ज्युनिअर दिग्दर्शित ‘हाऊस अरेस्ट’ या रशियन चित्रपटाला तर ‘प्ले ग्राउंड' या चित्रपटातील ‘नोरा' या भूमिकेसाठी माया वांडरबेक यांना आणि ’इरेजिंग फ्रँक’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गेबोर फेब्रिशिअस यांना विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला.

‘‘चित्रपट महोत्सवामध्ये इतर चित्रपट दिग्दर्शकांना आपले चित्रपट दाखवता येतात आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधता येतो.  प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून आपण चित्रपट शिकत जातो. त्यामुळे चित्रपट महोत्सव गरजेचे आहेत असे ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांनी सांगितले आहे.''  

टॅग्स :PIFFपीफartकलाcinemaसिनेमाcultureसांस्कृतिक