शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

‘सोमेश्वर’च्या आखाड्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता; पहिल्यांदाच भाजप उतरणार मैदानात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 19:47 IST

कारखान्याच्या इतिहासात प्रथमच भाजप सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उतरत आहे.

ठळक मुद्देशेवटच्या दिवशी २१ जागांसाठी ६३८ अर्ज दाखल

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी तब्बल ३८७ एवढ्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे २१ जागांसाठी आजअखेर तब्बल ६३८ एवढया जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र,छाननीसह माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल. 

राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप आणि शेतकरी कृती समितीच्या पॅनलमध्ये सध्या तरी लढत होणार असल्याचे चित्र आहे.शेवटपर्यंत हे चित्र राहिल्यास ‘सोमेश्वर’ची लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा परीषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे, माजी अध्यक्ष शहाजी काकडे,गौतम काकडे, दिग्विजय जगताप, आनंदकुमार होळकर, सिध्दार्थ गीते, विक्रम भोसले, हनुमंत भापकर, शैलेश रासकर, सतीश सकुंडे, दत्ता आबा चव्हाण, लक्ष्मण गोफणे, अजिंक्य सावंत, ऋषी गायकवाड,  राजेश चव्हाण, महेश जगताप,राजेश काकडे, तर शेतकरी कृती समितीच्या वतीने शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांच्यासह राहुल काकडे, अभिजीत काकडे, आप्पासो गायकवाड, शहाजी जगताप, प्रा बाळासाहेब जगताप, जालिंदर जगताप, अमर चव्हाण, कल्याण भगत या दिग्गजांसह ५५ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

कारखान्याच्या इतिहासात प्रथमच भाजप सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उतरत आहे. भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून ३५ उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, सोमेश्वरचे माजी संचालक पी के जगताप, बाळासो भोसले, विठ्ठल पिसाळ, खालील काझी,आदिनाथ सोरटे, हनुमंत शेंडकर, सोमनाथ राणे आदींचा समावेश आहे.भाजपची अंतिम यादी अंतिम टप्प्यात असल्याचे देखील भाजप नेते दिलीप खैरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  

यावेळी सोमेश्वरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांनी सर्वात जास्त अर्ज भरले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वांना सामावून घेत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही इच्छुकांची नाराजी दूर करावी लागणार आहे. उमेदवारी माघारी घेण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व इच्छुक उमेदवारांशी अजित पवार संपर्क साधणार असल्याचे समजत आहे.—————————————————निवडणूक निर्णय कार्यालयास लागोपाठ तीन दिवस सुट्टी असल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काहीशी गर्दी झाली होती .मात्र, प्रांत कार्यालयाने सोशल डिस्टन्सचे नियम पाळत हे अर्ज स्वीकारले .तसेच इच्छुक उमेदवारांनी देखील कोरोनाचे सर्व नियम पाळत अर्ज दाखल केले.प्रमोद काकडे, सभापती बांधकाम व आरोग्य जिल्हा परिषद पुणे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण