शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उजनीचे पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:16 IST

मराठवाडा बोगदा प्रकल्पाचे काम थांबवा; धरणग्रस्त कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

इंदापूर : निरा भिमा स्थिरीकरण अंतर्गत निरा खोऱ्यातून उजनी जलाशयाचे पाणी मराठवाड्यास देण्याचे नियोजन सुरु आहे. यासाठी निरा ते उजनी जलाशय व उजनी जलाशय ते सिना कोळगाव धरणापर्यंत (ता. परांडा) कालव्याचे काम सुरु झाले आहे. या कालव्यातून मराठवाडा भागासाठी देण्यात येणारे पाणी पावसाळ्यातच उजनी जलाशयातून लगेच पुढे मराठवाड्याकडे नेले जाणार आहे. उजनी धरणातील मृतसाठ्यातील पाणी देखील जाणार असल्याने पाण्याचे नियोजन कोलमडून पडणार आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांच्या जमिनी, शेती गेली त्यांच्यावर अन्याय होणार आहे.हे पाणी उजनी धरण ३० टक्के भरल्यानंतर म्हणजेच जलाशयाची पातळी ४९३ मीटर झाल्यानंतरच प्रवाही होणार आहे. त्यासाठी या कालव्याची पातळी ४८७ मीटर इतकी घेतली आहे. म्हणजेच धरणातील मुख्यकालव्याच्या तळपातळीपेक्षा ही खाली ठेवली गेली आहे. वास्तविक पहाता जलशास्त्राचा अभ्यास केल्यास ४९३ मीटरच्या वरील पाणी पुढे जाण्यासाठी ४९२ सुरवातीची तळपातळी पुरेशी आहे. मात्र ही पातळी ४८७ घेतल्यामुळे उजनी धरणातील जिवंत व मृतसाठ्यातील पाणी मराठवाड्याकडे नेहण्याचा उद्देश सरळ दिसून येत आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यास पाणी कमी पडणार असून त्यांचे पाणी नियोजन कोलमडून, कोट्यावधी रूपयांचे नुकसान होणार आहे. तसेच ज्यादा खोलीवरून कालवा खोदल्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जाणार आहेत.उजनी धरणाची पुर्ण संचय पातळी ४९६. ८२ असून धरणाची पाणी साठवण क्षमता ११६.२३ टीएमसी इतकी आहे. धरणाच्या मुळ प्रकल्प अहवालात नियोजित असलेल्या सिंचन क्षेत्रासाठीच्या कालव्याची सुरवातीची पातळीमुख्य कालवा - ४८७.२०भिमा सिना जोड कालवा बोगदा सुरवातीची तळ पातळी - ४८८.२०,सिना माढा उपसा सिंचन योजना पाणी उचलण्याची सर्वात खालची पातळी ४९१.०३ मीटर,धरणाची पाणी वापराची कमीतकमी पातळी (एमडीडीएल) ४९१.०३ मीटर आहे.यातील पाणी कमी झाल्यास उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणाºया बºयाच शेतकºयांचे नुकसान होणार आहे.उजनी धरणातील पाणी मूळ लाभधारक शेतकºयांना मिळत नाही. अक्कलकोट व मंगळवेढा या कालव्याच्या शेवटच्या भागात अद्यापही पाणी पोहोचलेले नाही. नियोजनात समाविष्ट केलेल्या नऊ उपसा सिंचन योजना अद्याप अपुर्णावस्थेतच आहेत.नवीन नियोजनात नसलेल्या बोगद्याची सुरवातीची तळपातळी ४८७ ऐवजी ४९२ रहाणे गरजेचे आहे. अन्यथा सिंचनास देखील पाणी मिळणार नाही व शेतकºयांचे नुकसान होईल. सध्या मराठवाडा बोगद्याचे २९ किलोमीटरचे काम होणार असून सदर काम ताबडतोब थांबविणे गरजेचे आहे. सहा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेतील तसेच शेतकºयांनी वेळीच जागे न झाल्यास त्यांचे नुकसान होणार आहे.त्यामुळे या बोगद्याचे काम त्वरित न थांबविल्यास धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती उजनी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी दिली.

टॅग्स :IndapurइंदापूरDamधरणwater shortageपाणीटंचाई