शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत शिक्षण घेत असताना फोनवरून पूजा पाठ; उच्चशिक्षित तरुणीला १८ लाखाचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 12:40 IST

पिंपरी चिंचवड परिसरात बोलावून त्यांचा सोन्याचा हार आणि सोन्याच्या बांगड्या असा ५ लाख ५९ हजाराचा ऐवज त्यांच्याकडून काढून घेतला

किरण शिंदे 

पुणे: २१ वर्षीय तरुणी.. उच्चशिक्षित.. अमेरिकेच्या शिकागोत शिक्षण घेते.. मात्र ती एका भोंदू बाबाच्या नादी लागली आणि स्वतःचं लाखो रुपयाचं नुकसान करून बसली. हा प्रकार घडलाय पुण्यात.. डेक्कन परिसरातल्या नळ स्टॉप  येथे. डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी कलम ४०६, ४२० आणि ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ अभयकुमार आमळे (रा. ९०४, स्मृती आनंद विजय नगर काळेवाडी पिंपरी चिंचवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २१ वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. नोव्हेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी या अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी शिक्षण असताना आरोपीने फोनवरून अध्यात्माद्वारे पूजापाठ आणि जप करून फिर्यादी सह त्यांच्या घरातील अडचणी सोडवतो असे सांगितले. यासाठी आरोपीने फिर्यादी कडून पैसे घेतले. पूजा झाल्यानंतर हे पैसे परत देतो असे आश्वासनही दिले. त्यानुसार आरोपीने फिर्यादी यांच्याकडून ११ लाख ८३ हजार रुपये घेतले. याशिवाय फिर्यादी जेव्हा भारतात परत आल्या तेव्हा त्यांचे महागडे कपडे असतील बॅगही आरोपीने घेतली. फिर्यादीला पिंपरी चिंचवड परिसरात बोलावून त्यांचा सोन्याचा हार आणि सोन्याच्या बांगड्या असा ५ लाख ५९ हजाराचा ऐवज त्यांच्याकडून काढून घेतला. याशिवाय रोख २ लाख ८२ हजार रुपये देखील काढून घेतले. 

दरम्यान या सर्व घटनेनंतर फिर्यादीने आरोपीकडे आजवर दिलेली रोख रक्कम आणि दागिने परत मागितले असता आरोपीने फिर्यादीचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी त्यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाWomenमहिलाPoliceपोलिसfraudधोकेबाजीMONEYपैसाEducationशिक्षण