Pooja Chavan Death Case police not investigating properly alleges bjp leader chitra wagh | Pooja Chavan Death Case: पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून धूळफेक करण्याचं काम; चित्रा वाघ यांचा आरोप

Pooja Chavan Death Case: पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून धूळफेक करण्याचं काम; चित्रा वाघ यांचा आरोप

पुणे:पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.त्यात वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे शक्तिप्रदर्शन केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली. याच गोष्टीमुळे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान आज भाजपने देखील पूजा प्रकरणात आक्रमकता धारण करत संजय राठोडांसह सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजप नेत्या चित्र वाघ यांनी गुरुवारी पुण्यात ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

वानवडी पोलीसांना आदेश न आल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. पुण्यामध्ये आज वाघ यांनी पुजा चव्हाणाने (Pooja Chavan Death Case) ज्या घरी आत्महत्या केली त्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जात तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून तपासाची माहिती घेतली. 

पोलिसांनी दोन आरोपींना सोडले. वानवडी पोलीस या प्रकरणी धूळफेक करण्याचे काम करत असून सर्व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहेत लेखी परवानगी नसल्याने एफआयआर दाखल नाही असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. चौकशी झाल्याशिवाय या प्रकरणातले सत्य बाहेर पडणार नाही. आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असे म्हणत तपास टाळण्याचा प्रयत्न केला जाईल, असा दावा वाघ यांनी केला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pooja Chavan Death Case police not investigating properly alleges bjp leader chitra wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.