शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत तपास करत राहणार; पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 18:47 IST

गेले काही दिवस पूजाच्या प्रकरणात पुणे पोलिसांवर प्रचंड टीका होत होती.

पुणे : पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत आम्ही तपास करणार आहोत असा दावा आता पुणेपोलिसांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात कायदेशीर अडचणी असल्यानेच गुन्हा नोंद केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गेले काही दिवस पूजाच्या प्रकरणात पुणे पोलिसांवर प्रचंड टीका होत होती. या प्रकरणात एका मंत्र्याचा हात असल्यामुळेच तपास केला जात नसल्याचा आरोप भाजप नेते करत होते. त्या पार्श्वभूमीवर तपास सुरु असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. 

पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा रविवारी घराच्या बाल्कनीमधून पडुन म्रूत्यु झाला होता. या मुलीचे काही कॅाल रेकॅार्डींग पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरुन पूजा ने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केली असल्याचा आरोप भाजप नेते करत होते. त्याचबरोबर पोलिसही हे प्रकरण दबावामुळे गांभीर्याने घेत नसून पूजाच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॅाप मध्ये अनेक धक्कादायक बाबी असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे होते. 

याप्रकरणी बाळगलेले मौन अखेर पोलिसांनी सोडले आहे. लोकमतशी बोलताना पूजा प्रकरणाचा सगळ्या अंगांनी तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ऑडिओ क्लिप्स हा गुन्हा नोंद करण्याचा आधार होऊ शकत नाही. तसेच तिच्या कुटुंबीयांनी तक्रार द्यायलाही नकार दिला असल्याने या प्रकरणी तांत्रिक अडचणींमुळे गुन्हा नोंद करता येत नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पूजा पडली त्यावेळी तिच्या सोबत तिचा चुलत भाउ आणि एक मित्र असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

ती रहात होती ते घर भाड्याने घेतलेले होते. ती स्पेकन इंग्लिशचा क्लास करायला पुण्यात आली होती आणि गेले आठ दिवस ती या घरात रहात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तपासा दरम्यान घरात मद्याच्या ४ बाटल्या होत्या. तसेच त्यातल्या अडीच बाटल्या रिकाम्या होत्या. यावरुन तीने प्रचंड प्रमाणात मद्यप्राशन केले होते ते स्पष्ट झाल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. गुन्हा नोंद नसल्याने केवळ जबाब घेता आले आहेत आणि कोणताही बेसिस नसल्याने कोणालाही या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले नाही किंवा अटक केली नाही असंही पोलिसांचे म्हणणे आहे. 

लोकमतशी बोलताना वानवडीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड म्हणाले , "पूजाचे पोस्ट मार्टम करण्यात आले आहे. तसेच तिच्या सोबत असलेल्या तिच्या चुलत भावाचे आणि मित्राचे जबाबही घेतले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे यात गुन्हा नोंद करता येत नाही. मात्र या प्रकरणाचा पुर्ण उलगडा होई पर्यंत आम्ही त्याचा तपास करणार आहोत. "

दरम्यान घटनेच्या वेळी पूजा गॅलरीत कठड्यावर बसलेली होती आणि तिने मद्यपान केलेले होते. त्यामुळे हा अपघात घातपात की आत्महत्या या सगळ्याच दिशांनी तपास सुरु असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPooja Chavanपूजा चव्हाणPoliceपोलिसState Governmentराज्य सरकारBJPभाजपा