शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पुणे जिल्ह्यातील ९ नगर परिषदा, २ नगर पंचायतींसाठी १८ ऑगस्टला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 12:43 IST

तसेच २ नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतींचीही निवडणूक...

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १७ जिल्ह्यांतील ९२ नगर परिषदा व ४ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील बारामतीसह अन्य ८ नगर परिषदांचा समावेश आहे. तसेच २ नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतींचीही निवडणूक होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदान १८ ऑगस्टला तर मतमोजणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यासाठी ५ जुलै रोजी मतदार याद्या अंतिम करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी २० जुलैला निवडणूक अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर २२ ते २८ जुलै दरम्यान अर्ज करता येणार आहे. तर २३ व २४ जुलै रोजी सुटी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. २९ जुलै रोजी अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अर्जांची छाननी २९ जुलै रोजी करण्यात येईल. ४ ऑगस्ट रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. १८ ऑगस्टला मतदान, तर १९ ऑगस्टला मतमोजणी होईल.

या नगर परिषद, नगर पंचायतींसाठी निवडणूक : पुणे जिल्ह्यातील बारामती ही अ वर्गातील नगर परिषद, तर खेडमधील चाकण व दौंड या ब वर्गातील नगर परिषदांचा समावेश आहे. तसेच क वर्गातील नगर परिषदांमध्ये खेडमधील राजगुरुनगर व आळंदी आणि इंदापूर, पुरंदरमधील जेजुरी, सासवड व शिरूर या नगर परिषदांचा समावेश आहे. तर नव्याने निर्मित झालेल्या आंबेगावमधील मंचर व बारामतीमधील माळेगाव नगरपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२