शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर रंगणार ‘ राजकीय वॉर’ काँग्रेस सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 21:06 IST

मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढला आहे...

ठळक मुद्देफेसबुक, व्हाट्स अ‍ॅपवरून उमेदवाराचा प्रचार

पुणे : मागील लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरात पिछाडीवर पडलेल्या काँग्रेस पक्षाने यावेळी मात्र आघाडी घेतली आहे. काँग्रेस भवनमध्ये वर्षभरापुर्वीच सोशल मीडिया सेल सुरू करण्यात आला असून या निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. उमेदवाराचा प्रचार, सभांचे प्रक्षेपण, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या चुकांवर बोट ठेवणारे व्हिडिओ, संदेश प्रसारित करण्यास सुरूवात झाली आहे. दिवसागणिक ही सोशल मीडिया वॉर रंगत जाणार आहे. निवडणुक काळात उमेदवार प्रचार सभा, फेऱ्या, मतदारांच्या गाठीभेटींमध्ये व्यस्त असतात. पण सर्वच मतदारांपर्यंत पोहचणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला. त्याचा त्यांना खुप फायदाही झाला. त्यानंतर इतर पक्षांना सोशल मीडियाचे महत्व कळाले. त्यावेळी पुण्यात काँग्रेसने सोशल मीडियाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यानंतरच्या विधानसभा व महापालिका निवडणुकीत पक्ष फार सक्रीय नव्हता. याचे महत्व ओळखून वर्षभरापूर्वी काँग्रेस भवनमध्ये स्वतंत्र सोशल मीडिया वॉर रुम तयार करण्यात आली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोशल मीडिया सेल सक्रीय झाल्याचे सेलचे प्रमुख चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले. प्रामुख्याने फेसबुक आणि वॉट्स अ‍ॅपचा वापर अधिक प्रमाणावर केला जात आहे. व्हाट्स अ‍ॅपवर एकावेळी १५ ते २० हजार लोकांपर्यंत पोहचतो. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभांचे लाईव्ह प्रक्षेपण, विविध योजना, जाहीरनाम्यातील आश्वासनांचे व्हिडिओ, संदेश, उमेदवाराच्या सभा, पदयात्रा, गाठीभेटींचे लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. नरेंद्र मोदी यांनी यापुर्वी दिलेली आश्वासने आणि सद्यस्थिती याचेही व्हिडिओ तयार केले जात आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाणीप्रश्न, वाढती गुन्हेगारी, वाहतुक समस्या, स्मार्ट सिटीचा उडालेला फज्जा अशा अनेक मुद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून घेरण्यात येणार आहे. काँग्रेसने आतापर्यंत शहरात आणलेले प्रकल्प, त्यामुळे शहराचा झालेला विकासही या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोहचविला जाईल. त्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युबचाही वापर केला जात आहे. उमेदवार उशिरा जाहीर झाल्याने काही मयार्दा आल्या होत्या. पण आता पुर्ण ताकदीने मैदानात उतरलो असल्याचे पुरंदरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेWhatsAppव्हॉटसअ‍ॅपTwitterट्विटरFacebookफेसबुकcongressकाँग्रेस