'दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही', अंकिता पाटलांचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 19:33 IST2022-02-01T19:26:49+5:302022-02-01T19:33:11+5:30
राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंवर अंकिता पाटलांचा निशाणा...

'दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही', अंकिता पाटलांचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा
बारामती: विकास कामांमध्ये पोलिसी बळाचा वापर करून राज्यमंत्र्यांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही अशा दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही. अशा शब्दात जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील ठाकरे (ankita patil) यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (dattatray bharne) यांच्यावर निशाणा साधला.
अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की,' जिल्हा परिषद सदस्या भारती मोहन दुधाळ यांनी वेळोवेळी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामासाठी तसेच कौठळी येथील तीन वर्ग खोल्यांच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेशी सातत्याने पत्रव्यवहार केला. तसेच 22 लाख 50 हजाराचा निधी तीन वर्ग खोल्यासाठी मंजूर करून घेतला होता. त्याच्याच भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असताना राज्यमंत्र्यांनी आपल्या बळाचा वापर करीत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या विकास कामाच्या उद्घाटनावेळी अडथळा आणल्याचा आरोप अंकिता पाटलांनी केल आहे.
यानंतर अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते सदर कामाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती देवराज भाऊ जाधव, माजी सरपंच प्रकाश काळेल, भारतीय जनता पार्टी विस्तारक राजकुमार जठार व कौठळी गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.