Pune Airport: भाजप नेत्यांच्या गटबाजीमुळे पुण्यात विमानतळाचे राजकारण; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 06:58 PM2022-03-24T18:58:02+5:302022-03-24T18:58:12+5:30

भाजपच्या गटबाजीमुळे शहरातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची शक्यता दुरावत असल्याचे काँग्रेसने म्हटले

politics of pune airport due to factionalism of bjp leaders criticism of congress | Pune Airport: भाजप नेत्यांच्या गटबाजीमुळे पुण्यात विमानतळाचे राजकारण; काँग्रेसची टीका

Pune Airport: भाजप नेत्यांच्या गटबाजीमुळे पुण्यात विमानतळाचे राजकारण; काँग्रेसची टीका

Next

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या पुण्यातील नेत्यांमध्ये असलेल्या लाथाळ्या शहरातील विमानतळासाठी मारक असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. त्यांच्या गटबाजीमुळे शहरातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची शक्यता दुरावत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, माजी महापौर व अन्य नेते दिल्लीत जाऊन पुण्यात नव्या विमानतळाची मागणी करतात व दुसरीकडे त्यांनी दि्ल्लीला जाताना व दिल्लीतही डावललेले त्यांच्याच पक्षाचे खासदार गिरीश बापट पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विमानतळाच्या विस्तारीकरणावर भाष्य करतात. हा सगळा प्रकारच अनाकलनीय आहे. शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील व्यावसायिक, उद्योजक मागील अनेक वर्षांपासून पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे अशी मागणी करत आहेत. देशाच्या संसदेत यावर चर्चा झाली. खासदार शरद पवार यांनी या मागणीचे महत्व त्या चर्चेत विषद केले. काँग्रेस पक्षही त्यासाठी जनमत तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.

त्यामुळेच याचे महत्व लक्षात घेऊन माजी महापौर मुरलीधर मोहोळ तसेच भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी थेट दिल्ली गाठली. खासदार प्रकाश जावडेकर, राज्यसभेचे सभासद विनय सहस्रबुद्धे यांना बरोबर घेत संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर पुणे विमानतळ विस्तारीकरण आणि पुरंदर येथे नव्याने आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारणे अशा दोन विषयांवर चर्चा झाल्याचे माजी महापौरांनी सांगितले. यात त्यांनी आपल्याच पक्षाचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना बाजूला ठेवले, त्यामुळेच त्यांनी लोहगाव विमानतळाला गुरूवारी भेट दिली. शरद पवार यांच्यावर अनाठायी टीका करत लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणावर उगीचच भाष्य केले. स्थानिक खासदारांना डावलून अन्य नेते थेट दिल्लीत जाऊन बैठक घेतात याचा अर्थ काय समजायचा असा प्रश्न मोहन जोशी यांनी केला.

Web Title: politics of pune airport due to factionalism of bjp leaders criticism of congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.