शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

चित्रकारावर ‘राजकीय दबाव’

By admin | Updated: June 17, 2016 05:17 IST

बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा परस्पर राजकीय कार्यक्रमांना देण्याचे उद्योग अद्यापही थांबलेले नसताना आता कलादालनदेखील याच्या कचाट्यात सापडू लागले आहे. येत्या १८ व १९

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा परस्पर राजकीय कार्यक्रमांना देण्याचे उद्योग अद्यापही थांबलेले नसताना आता कलादालनदेखील याच्या कचाट्यात सापडू लागले आहे. येत्या १८ व १९ जूनला भाजपाचे अधिवेशन रंगमंदिरात होणार आहे, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार असल्याने पोलीस बंदोबस्ताचे कारण पुढे करीत कलादालनात दि. १८ जूनपर्यंत प्रदर्शन भरविणाऱ्या चित्रकार हरेश पैठणकर यांना दोन दिवसच प्रदर्शन लावण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे. या अशा प्रकारच्या राजकीय दबावामुळे कलाकारांची एकप्रकारे मुस्कटदाबी केली जात असून, पुण्याला खरच सांस्कृतिक शहर म्हणावे का? यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन महिने आधी नाटकांसाठी तारखा बुक करूनदेखील महापालिकेकडून अचानक राजकीय कार्यक्रमांना नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाणे हे प्रकार नित्यनेमाने घडत आहेत, ज्याचा फटका सातत्याने निर्मात्यांना बसत आहे, मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीच पावले उचलली गेलेली नाहीत. महापालिकेने याबाबत नियमावली करण्याचे सूचित केले होते, मात्र ती अद्यापही तयार करण्यात आलेली नाही. आता नाट््यगृहाप्रमाणेच कलादालनदेखील याच्या कचाट्यात सापडू लागले आहे. ज्याचा नाहक त्रास कलाकार मंडळींना सहन करावा लागत आहे. येत्या १८ जूनपर्यंत हरेश पैठणकर यांचे ‘रंग सह्याद्रीचे’ हे चित्रप्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे.या कलादालनासाठी दोन महिन्यांपूर्वी त्यांनी बुकिंग केले आहे, तरीही भाजपाच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री येणार असल्याने पोलीस बंदोबस्तासाठी दोन दिवसच प्रदर्शन भरवावे अशी सूचना त्यांना पालकमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. दि. १८ जून हा तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन असल्याने याच दिवशी प्रदर्शनाचा समारोप व्हावा अशी पैठणकर यांची इच्छा आहे, तशी विनंती ते भाजपाच्या वरिष्ठांकडे करणार आहेत. यापूर्वीही ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी कलाकारांना मिळणाऱ्या या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती, तरीही स्थिती ‘जैसे थे’च आहे. - दोन महिने आधी नाटकांसाठी तारखा बुक करूनदेखील महापालिकेकडून अचानक राजकीय कार्यक्रमांना नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाणे हे प्रकार नित्यनेमाने घडत आहेत, त्याचा फटका निर्मात्यांना बसत आहे.शनिवार (१८ जून) सुट्टीचा दिवस असल्याने प्रदर्शनाला गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. या दिवशी जरी भाजपाचे अधिवेशन असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रदर्शन पाहायला नक्की येऊ शकतील, कार्यकर्तेही त्याचा लाभ घेतील. हे जरी शक्य झाले नाही तरी अधिवेशनच्या काळात तीन तास हे प्रदर्शन मी बंद ठेवू शकतो.- हरेश पैठणकर, चित्रकार