शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांची आता मतदारांना स्लीप वाटपासाठी लगबग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 13:49 IST

आता मतदारांना त्यांचे मतदान केंद्राची माहिती पोहचविण्यासाठी राजकीय पक्षांकडून चढाओढ सुरू झाली आहे..

ठळक मुद्देपुणे लोकसभा मतदारसंघात २० लाख ७४ हजार ८६१ मतदार सर्वच मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकडून विविध माध्यमातून प्रचारपदयात्रा, सभा, बैठका, मेळावे, गाठीभेटी घेतली जात असल्याने प्रचारात रंगत

पुणे : मतदानासाठी आता केवळ चार दिवस उरल्याने राजकीय पक्षांकडून मतदारांना त्यांचे नाव, मतदान केंद्राचा उल्लेख असलेल्या स्लीप वाटण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून प्रचाराची संधीही साधली जात आहे. त्यासाठी हजारो कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले आहे.पुणे लोकसभा मतदारसंघात २० लाख ७४ हजार ८६१ मतदार आहेत. सर्वच मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकडून विविध माध्यमातून प्रचार केला जात आहे. पदयात्रा, सभा, बैठका, मेळावे, गाठीभेटी घेतली जात असल्याने प्रचारात रंगत आली आहे. पण त्याचबरोबर आता मतदारांना त्यांचे मतदान केंद्राची माहिती पोहचविण्यासाठी राजकीय पक्षांकडून चढाओढ सुरू झाली आहे. मतदानाच्या स्लीपबरोबच उमेदवाराची जाहिरातही केली जात आहे. राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदाराची स्लीप तयार केली असून बुथ अध्यक्ष, पोलिंग एजंटकडे बुथनिहाय मतदारांची यादी सुपुर्द केली आहे. बुथ प्रमुख, पन्ना प्रमुख अशी यंत्रणा पक्षांनी उभारली आहे. प्रत्येक बुथनिहाय मतदारांना स्लीप वाटण्यासाठी उमेदवारांनी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. पुढच्या दोन-तीन दिवसात स्लीप वाटपाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.  सर्व बुथ प्रमुखांकडे एव्हाना मतदारांच्या याद्या व स्लीपा पोहचवण्याचे काम सुरु झाले आहे. काही प्रभागांमध्ये प्रत्यक्ष स्लीप वाटपाचे कामही सुरू करण्यात आले आहे. मतदाराचे नाव, पत्ता, मतदान केंद्र अशी माहिती या स्लीपवर आहे. तर वरील बाजूला उमेदवाराचे छायाचित्र, चिन्ह व त्यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदारानाच्या एक-दोन दिवस आधी याचे वाटप पुर्ण केले जाईल. काहींनी व्हॉट्स अँपवरुनही स्लीपा पाठवण्याचा आधुनिक मार्ग स्विकारला आहे. -------------

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाVotingमतदान