बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 19:54 IST2019-01-16T19:17:46+5:302019-01-16T19:54:49+5:30
वेश्या व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनकडून धडक कारवाई करण्यात आली.

बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई
पुणे : वेश्या व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनकडून धडक कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जातो का तसेच बेकायदेशीर व्यवसाय केला जातो का याची पाहणी पोलिसांनी केली. आज संध्याकाळी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले.
बुधवार पेठेतील 35 इमारतींची पोलिसांनी पाहणी केली. पोलीस निरीक्षक के. एन. नावंदे म्हणाले, पोलिसांकडून आज धडक कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जाऊ नये तसेच बेकायदेशीर व्यवसाय केला जातो का याची पाहणी पोलिसांनी केली. तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलाचे आधार कार्ड आणि इतरओळख पत्र तपासण्यात आले. त्या व्यतिरिक्त कोणी बाहेरचे व्यवसाय करतात का याची सुद्धा पाहणी यावेळी करण्यात आली.