शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या धास्तीने चोरांनी नेऊन ठेवले २१ तोळे सोने घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 07:06 IST

पोलिसांच्या धास्तीने सोमवारी सकाळी ६ वाजता घराचे दार उघडले तर दारात उलटा तांब्या ठेवलेला दिसला. तो त्यांनी उचलून पाहिला असता, चोरी झालेले २१ तोळे सोने जसेच्या तसे आढळून आले.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील डॉ. प्रशांत राजाराम घाडगे (रा. लोणी देवकर, घाडगेवस्ती) येथून बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी करून २१ तोळे सोन्याची चोरी केली. ही घटना शनिवारी रात्री ८ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्यात घाडगे यांनी चोरीची फिर्याद दाखल केली. यावरून चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण पोलिसांच्या धास्तीने सोमवारी सकाळी ६ वाजता घराचे दार उघडले तर दारात उलटा तांब्या ठेवलेला दिसला. तो त्यांनी उचलून पाहिला असता, चोरी झालेले २१ तोळे सोने जसेच्या तसे आढळून आले.घाडगे यांच्या पत्नी सविता, मुलगी आर्या सकाळी सात वाजता हॉस्पिटलमध्ये आले. त्यानंतर त्यांची आईदेखील सकाळी दहा वाजता इंदापूर येथे नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री दहा वाजता घरी आल्यानंतर घराला फक्त कडी लावली असल्याचे दिसून आले. त्यांनी घर उघडून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी शेजारी जाऊन आमच्या घरी कोण आले होते का, असे विचारले असता शेजाऱ्यांनी कोणी घरी आले नसल्याचे सांगितले. तसेच रात्री ८ वाजेपर्यंत घराला कुलूप होते, असेही सांगितले. तेव्हा घरातील लोखंडी कपाटाचे लॉक उघडून ५ लाख ९३ हजार रुपये किमतीचे २१ तोळे सोने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर रविवारी (दि. २८) इंदापूर पोलिसांच्यावतीने सकाळी ७ वाजता पुण्यावरून श्वानपथक मागविण्यात आले. त्या ठिकाणी पोलिसांनी सर्वत्र तपासणी करून, श्वानपथकाला संपूर्ण परिसर फिरवून, घटनास्थळी कपाटावरील बोटांचे ठसे घेतले, असे दोन तास पुरावे गोळा करून सकाळी १० वाजता इंदापूर पोलीस ठाण्यात पुढील तपास करण्यासाठी आले. मात्र त्यावेळी पोलिसांचा संपूर्ण फौजफाटा व त्यांची संपूर्ण मॉकड्रील पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला होता. यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक राम गोमारे, शैलेंद्र औटे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बडे, जगदीश चौधर, बापू मोहिते, अमित चव्हाण, विक्रम जाधव यांनी घटनास्थळी तातडीने पाहणी करून पुरावे जमा केले होते. त्यानंतर सोमवारी (दि. २९) सकाळी ६ वाजता शारदा घाडगे यांनी त्यांच्या घराचे दार उघडले तर दारात उलटा तांब्या ठेवलेला दिसला, तो त्यांनी उचलून पाहिला असता, त्यात २१ तोळे सोने (जसेच्या तसे) आढळून आल्याचे घाडगे यांनी इंदापूर पोलिसांना फोन करून सांगितले. पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरट्यांच्या दिशेने जलद चक्रे फिरवल्याने त्यांच्या शोधाच्या धसक्यानेच अज्ञात चोरट्याने सोने परत दारात आणून ठेवले, त्यामुळे इंदापूर पोलिसांचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्याची ही इंदापूर तालुक्यातील पहिलीच घटना आहे.घाडगे कुटुंबाने केला सर्व पथकाचा सत्कारलोणी देवकर येथील घटनास्थळी गुन्हे शोध पथकाने जलद हालचाली केल्यानेच आमचे चोरीला गेलेले सोने सापडले, अशी भावना इंदापूर पोलीस ठाण्यात डॉ. प्रशांत घाडगे, सविता घाडगे व त्यांची मुलगी आर्या यांनी व्यक्त करून, पोलिसांना त्या लहानग्या मुलीने थंकयू अंकल म्हणत, पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या दालनात सर्व पथकाला पुष्पगुच्छ व हार, श्रीफळ देऊन, त्यांना पेढे भरवून त्यांचे आभार मानले.

टॅग्स :GoldसोनंThiefचोरtheftचोरीPoliceपोलिसIndapurइंदापूर