शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नाकाबंदी मोडून जाणाऱ्या कारला रोखण्यासाठी पोलिसांचा थरारक पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 8:07 PM

निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा अनुुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस उपाययोजना करत आहेत.

ठळक मुद्देकारमध्ये पिस्तुल, तलवार आढळली : कारसह ५ लाख ६४ हजारांचा माल जप्त 

बारामती : शहर पोलिसांनी केलेली नाकाबंदी मोडून जाणाऱ्या भरधाव कारला पोलिसांनी थरारक पाठलाग करून रोखले. या वेळी कारमध्ये तलवारीसह पिस्तुल घेऊन जाणाऱ्या  दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पोलिसांनी कारसह ५ लाख ६४ हजारांचा माल जप्त केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा अनुुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस उपाययोजना करत आहेत. २० एप्रिल रोजी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. बारामती शहरातून निळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून अग्निशस्त्राची वाहतूक होत आहे. ही कार इंदापूरकडे जाणार आहे, अशी खात्रीशीर बातमी त्यांना मिळाली होती. त्यावर पाटील यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक सतीश आस्वर व पोलीस कर्मचाऱ्यांना बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदापूर रस्त्यावर नाकाबंदी करण्याची सूचना केली. तसेच, संबंधित वाहन आल्यानंतर त्याची तपासणी करण्याचे आदेश दिला. त्याप्रमाणे लिमटेक (ता. बारामती) येथे नाकाबंदी लावून वाहन तपासणी सुरू असताना बारामती बाजूने एक निळ्या रंगाची स्विफ्ट कार येताना पोलिसांना दिसली. नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी हे वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, कारचालकाने पोलिसांना जुमानले नाही. तो कार न थांबता नाकाबंदी तोडून भरधाव इंदापूरचे दिशेने निघाला. पोलीस उपनिरीक्षक आस्वर व पोलीस कर्मचाऱ्यांनी खासगी वाहनाने  कारचा पाठलाग केला. ती मौजे खोरोची (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे थांबविली. मात्र, कारचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्या कारमधील इसमांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तिची तपासणी केली. या वेळी कारमध्ये एक पिस्तुल (अग्निशस्त्र) व एक लोखंडी तलवार मिळून आली. या ठिकाणाहून एक तलवार, एक पिस्तुल आणि कार व दोन मोबाईल, असा एकूण ५ लाख ६४ हजार रुपयांचा माल जप्त केला.  कारमधील  राजेंद्र रामचंद्र सल्ले (वय ४६, रा .खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे), मनोहर पोपट काळभोर (वय ३०, रा. देशमुखवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पष्णू राजेंद्र सल्ले (रा. खोरोची, ता. इंदापूर जि. पुणे) हा फरारी आहे. त्याच्यावर इंदापूर व वालचंदनगर पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अजित राऊत यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये फिर्याद दिली आहे. सहायक फौजदार संदिपान माळी तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतीश आस्वर, सहायक फौजदार संदिपान माळी, पोलीस नाईक रमेश केकाण, दादासाहेब डोईफोडे, पोलीस कॉन्स्टेबल रूपेश साळुके, तुषार चव्हाण, अजित राऊत, तुषार सानप, नूतनकुमार जाधव, पोपट नाळे, सिद्धेश पाटील यांनी केली.

टॅग्स :BaramatiबारामतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी