पोलीस ठाण्यातील मुद्देमाल होणार अत्याधुनिक मध्यवर्ती केंद्रात जतन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 02:09 PM2019-06-13T14:09:55+5:302019-06-13T15:10:15+5:30

पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्ष म्हणजे एकप्रकारची अडगळीची खोली असे आतापर्यंत तिचे स्वरुप राहत आले आहे़..

The police station will be deployed in modern Central Center | पोलीस ठाण्यातील मुद्देमाल होणार अत्याधुनिक मध्यवर्ती केंद्रात जतन 

पोलीस ठाण्यातील मुद्देमाल होणार अत्याधुनिक मध्यवर्ती केंद्रात जतन 

Next
ठळक मुद्देएका क्लिवर मिळणार इत्यंभूत माहिती : राज्यातील पहिलाच प्रयोग शिवाजीनगर मुख्यालयात अत्याधुनिक मध्यवर्ती मुद्देमाल केंद्र तयार खटल्याचा निकाल लागल्यानंतर त्या न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करायच्या असतात़ सर्व मुद्देमाल पोलीस ठाणेनिहाय रॅक्स व बॉक्समध्ये जतन करण्यात येणार

पुणे : एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस त्यातील आरोपी व गुन्ह्यासाठी वापरलेल्या विविध वस्तू जप्त करतात़. तो खटल्याच्या वेळी सादर करण्यासाठी मुद्देमाल कक्षात जपून ठेवला जातो़. मात्र, अनेकदा या मुद्देमालाचे व्यवस्थित जतन न झाल्याने प्रत्यक्ष काही वर्षांनी खटला सुरु झाल्यावर तो वेळेवर न सापडणे, तो खराब होणे, असे अनेक वेळा होते़ त्याचा खटल्यावरही परिणाम होत असतो़. यापुढे आता तसे होणार होणार नाही़. कारण शिवाजीनगर मुख्यालयात अत्याधुनिक मध्यवर्ती मुद्देमाल केंद्र तयार करण्यात येत आहे़. या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातील मुद्देमाल जतन करण्यात येणार आहे़. त्यासाठी आता स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे़. 
कोथरुड पोलीस ठाण्यामध्ये तब्बल १७ वर्षे जुना तरुणाचा सांगाडा मुद्देमाल कक्षामध्ये पडून असल्याचे नुकतेच आढळून आले होते़. पोलिसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले़. पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्ष म्हणजे एकप्रकारची अडगळीची खोली असे आतापर्यंत तिचे स्वरुप राहत आले आहे़. अनेकदा एखाद्या खटल्यातील कागदपत्रे, जप्त केलेल्या वस्तू या पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात ठेवल्या जातात़. खटल्याचा निकाल लागल्यानंतर त्या न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करायच्या असतात़. अनेकदा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या झाल्यावर जेव्हा खटल्याची सुनावणी सुरु होते, त्यावेळी संबंधित खटल्यातील मुद्देमाल शोधण्यासाठी पोलिसांना रजिस्टर धुंडाळावी लागतात़ अनेकदा वेळेवर कागदपत्रे न सापडणे, सापडली तर ती खराब होणे असे प्रकार घडतात़ सध्या शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये किती मुद्देमाल आहे. याची कोणतीही एकत्रित माहिती कोठेही उपलब्ध नाही़. त्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने मुद्देमाल अद्ययावत ठेवण्यासाठी मध्यवर्ती मुद्देमाल कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे़. राज्यातील हा पहिला प्रयोग असणार आहे़. 
या मध्यवर्ती कक्षामध्ये सर्व मुद्देमाल पोलीस ठाणेनिहाय रॅक्स व बॉक्समध्ये जतन करण्यात येणार आहे़. या प्रत्येक मुद्देमालाला क्युआर कोडाचा अवलंब केला जाणार आहे़. त्यामुळे पोलिसांना जेव्हा लागेल, त्यावेळी एका क्लिकवर संबंधित केसचा मुद्देमाल कोठे व कोणत्या रॅक्समध्ये आहे हे समजणार आहे़. न्यायालयात सादर करताना व तो परत केंद्रात जमा करताना स्वतंत्र चलन असणार आहे़ त्यामुळे सर्व मुद्देमालावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे़. 
मध्यवर्ती मुद्देमाल केंद्राकरिता मोबाईल अ‍ॅप, सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे़. या केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून येथे २४ तास सशस्त्र गार्डचा बंदोबस्त असणार आहे़ 
या मध्यवर्ती मुद्देमाल केंद्रासाठी स्वतंत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देण्यात येत आहे़. त्यामुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील मुद्देमालाचे जतन व्यवस्थित होणार असून जेव्हा पाहिजे तेव्हा तो तातडीने उपलब्ध होणार आहे़. मध्यवर्ती मुद्देमाल केंद्रात जमा करण्यात येणाऱ्या मुद्देमालाची सर्वस्वी जबाबदारी केंद्रातील प्रभारी अधिकारी व कारकून यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे़. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवरील कामाचा ताण कमी होणार आहे़. 
़़़
* पोलिसांच्या मुद्देमाल जतन करण्याची पद्धत होणार अत्याधुनिक
* जुन्या खटल्यातील मुद्देमाल एका क्लिकवर दिसणार
* मुद्देमालाचे जतन एकाच पद्धतीने आणि सुसुत्रीकरण होणार
* पोलीस ठाण्यांवरील ताण कमी होऊन त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर राहणार

Web Title: The police station will be deployed in modern Central Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.