डेक्कन जिमखान्यावर पोलिसांनी पकडला ९ किलो गांजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 21:37 IST2018-09-25T21:36:09+5:302018-09-25T21:37:10+5:30
डेक्कन जिमखाना परिसरातील खिलारेवाडी येथे अमली पदार्थाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाला मिळाली़.

डेक्कन जिमखान्यावर पोलिसांनी पकडला ९ किलो गांजा
पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील खिलारेवाडी येथे गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले़. त्यांच्याकडून तब्बल ९ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे़.
संजय बाटुंगे (वय ४५), सुरेश पंडित (वय २०, दोघे रा़ खिलारेवाडी) आणि राजू सोनवणे (वय २९, रा़ खडकवासला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.
पोलिसांनी सांगितले की, खिलारेवाडी येथे अमली पदार्थाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाला मिळाली़. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी खिलारेवाडी येथे सापळा रचून दोघांना पकडले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत राजू सोनवणे याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले़. त्यानुसार तिघांना अटक करुन त्यांच्याकडून ९ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे़.
त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी गांजा कोठून आणला, यापूर्वी त्यांनी कोणाला त्याची विक्री केली आहे, याचा तपास करायचा असून त्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती करण्यात आली़. न्यायालयाने ती मान्य कन तिघांना अधिक तपासासाठी २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़.