खडकवासला येथे सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:52 IST2020-01-28T16:52:47+5:302020-01-28T17:52:15+5:30
आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द यापूर्वी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल

खडकवासला येथे सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त
खडकवासला: येथील सिंहगड रस्त्यावर चौकात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने एका सराईताकडून कारसह गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त करून त्याला अटक केली आहे.ही कारवाई मंगळवारी ( २७ जानेवारी) सायंकाळी गुन्हे शाखेचे पथक सिंहगड रोड परिसरात रेकॉर्डवरील फरारी आरोपीचा शोध घेत असताना येथील दत्तात्रय शिवाजी मते हा दहशतीसाठी त्याचेजवळ गावठी पिस्तूल बाळगून कारने (एमएच-१२ ईएक्स ६१७४) एनडीए रोडने सिंहगड बाजूकडे येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथकाने साध्या वेशात खडकवासला धरण चौकात सापळा रचून दत्तात्रय शिवाजी मते (वय ४५ वर्षे) रा.खडकवासला, ता.हवेली यास अटक करून विनापरवाना गावठी पिस्तूल व १ जिवंत काडतुस असा कारसह रुपये (दोन लाख चारशे) रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द यापूर्वी हवेली व उत्तमनगर या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.