पोलीस भरती परीक्षा १७ एप्रिलला, ४ हजार २०० पात्र उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:16 AM2018-04-12T00:16:18+5:302018-04-12T00:16:18+5:30

पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाई पदासाठी घेतलेल्या शारीरिक चाचणीतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या मंगळवारी, दि.१७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात येणार आहे़

Police recruitment examination on 17th April, 4 thousand 200 eligible candidates | पोलीस भरती परीक्षा १७ एप्रिलला, ४ हजार २०० पात्र उमेदवार

पोलीस भरती परीक्षा १७ एप्रिलला, ४ हजार २०० पात्र उमेदवार

Next

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील २१३ पोलीस शिपाई पदासाठी घेतलेल्या शारीरिक चाचणीतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या मंगळवारी, दि.१७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात येणार आहे़
पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई भरतीसाठी एकूण ४६ हजार ८७५ उमेदवारांनी शारीरिक परीक्षा दिली़ त्यापैकी २८ हजार उमेदवार पात्र ठरले असून, त्यापैकी लेखी परीक्षेसाठी ४ हजार २०० उमेदवार पात्र ठरले आहेत़
लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना महाआॅनलाइन यांच्याकडून प्रवेशपत्र देण्यात येणार आहे़ संबंधित उमेदवारांनी ते प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रत सोबत आणावी़ लेखी परीक्षेची बैठक व्यवस्था, कापडी चेस्ट नंबर प्राप्त करून घेण्यासाठी व त्या संदर्भातील देण्यात येणाऱ्या सूचनांकरिता संबंधित उमेदवारांनी दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयाकडून मैदानी चाचणीच्या वेळी देण्यात आलेले ओळखपत्र व महाआॅनलाइनकडून देण्यात येणाºया ओळखपत्रासह शिवाजीनगर पोलीस मुख्यालय कवायत मैदानात समक्ष उपस्थित राहावे़ पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा मंगळवारी, दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर घेण्यात येणार आहे़
संबंधित उमेदवारांनी सकाळी ५ वाजता परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहावे़ लेखी परीक्षेसाठी उमेवारांनी आपली ओळख पटविण्याकरिता फोटो आयडी म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, मोटार वाहन परवाना यापैकी एक सोबत आणणे आवश्यक आहे़
परीक्षेकरिता उमेदवारांना पॅड व काळे बॉलपेन पोलीस आयुक्त कार्यालयाकडून पुरविण्यात येणार आहे़
लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी मोबाइल, कॅलक्युलेटर, डिजिटल वॉच, हेडफोन, ब्ल्यू टूथ यासारखी इलेक्ट्रॉनिक साधने सोबत आणू नयेत़ उमेदवार लेखी परीक्षेदरम्यान उशिरा आल्यास, ओळखपत्र, चेस्ट नंबर नसल्यास तसेच लेखी परीक्षेच्या दरम्यान गैरप्रकार, गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करून, त्यांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशा सूचना पुणे पोलिसांनी दिल्या आहेत़
>लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी यादी पुणे पोलिसांच्या वेबसाईट व तसेच शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.
- शेषराव सूर्यवंशी,
पोलीस उपायुक्त

Web Title: Police recruitment examination on 17th April, 4 thousand 200 eligible candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस