पोलिसाला चौकीतच केली धक्काबुक्की

By Admin | Updated: April 6, 2015 05:37 IST2015-04-06T05:37:04+5:302015-04-06T05:37:04+5:30

चौकशीसाठी बोलावल्याच्या कारणावरून पोलीस चौकीत गोंधळ घालत पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी राजाराम शंकर पाटील

Police raid police in Chaki | पोलिसाला चौकीतच केली धक्काबुक्की

पोलिसाला चौकीतच केली धक्काबुक्की

पिंपरी : चौकशीसाठी बोलावल्याच्या कारणावरून पोलीस चौकीत गोंधळ घालत पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी राजाराम शंकर पाटील (वय ५४, रा. विकास सोसायटी, रुपीनगर, तळवडे) याला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास रुपीनगर चौकीत घडला.
या प्रकरणी अमित गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पाटील याला चौकशीसाठी चौकीत बोलावले होते. यावरून पाटील याने आरडाओरडा करीत गायकवाड यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी पाटीलला अटक केली.(प्रतिनिधी)

Web Title: Police raid police in Chaki