शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती...
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
5
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
6
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
7
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
8
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
9
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
10
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
11
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
12
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
13
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
14
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
15
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
16
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
17
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
18
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
19
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
20
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी

पोलीस प्रोटेक्शन गरज की ‘फॅड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 13:19 IST

शहरात सध्या एकूण ४७ जणांना वर्गीकरण न केलेल्या गटातून संरक्षण देण्यात आले आहे. त्यातील ३७ जणांना कुठलेही शुल्क न घेता संरक्षण दिले गेले आहे.

ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिक ते विद्यार्थी यांना विशेष सुरक्षा सुरक्षा मिळावी याकरिता दर महिन्याला २५ ते ३० अर्जअभ्यासपूर्वक अर्जांची छाननी केल्यानंतर पोलीस संरक्षण द्यायचे किंवा नाही याचा निर्णय 

- युगंधर ताजणे - पुणे : फोनवरुन कुणी धमकी दिली, भर सभेत एखाद्या विषयी अनुउदगार काढले. याशिवाय सतत प्रसिध्दीच्या झोतात असलेल्यांच्या मानगुटीवर भीतीचे सावट असल्याचे पाहवयास मिळते. यामुळेच स्वत:च्या संरक्षणाकरिता पोलीसांकडे अर्ज करण्याचा एक वेगळाच ट्रेंड चर्चेत आला आहे. त्यामुळे संंबंधित व्यक्तीला देण्यात आलेले संरक्षण त्याची खरोखरीच गरज की फँड आहे? असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहरात सध्या एकूण ४७ जणांना वर्गीकरण न केलेल्या गटातून संरक्षण देण्यात आले आहे. त्यातील ३७ जणांना कुठलेही शुल्क न घेता संरक्षण दिले गेले आहे. तर उर्वरीत १० जणांना सशुल्क संरक्षण देण्यात आले आहे. यात बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती, समाजसेवक, नगरसेवकांसह विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. स्व संरक्षणाकरिता साधारण दर महिन्याला २५ ते ३० अर्ज पोलीस मुख्यालयात येतात. मात्र सरसकट कुणालाही पोलीस संरक्षण दिले जात नाही. ज्या कुणाला संरक्षण द्यायचे आहे त्या व्यक्तीची पूर्ण चौकशी केल्यानंतर, त्याने संरक्षणाकरिता जे कारण नमुद केले आहे त्याची तपासणी झाल्यावर, अर्जाचा विषय तपासणी समितीपुढे ठेवला जातो. अभ्यासपूर्वक अर्जांची छाननी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलीस संरक्षण द्यायचे किंवा नाही याचा निर्णय घेतला जातो. कुठल्याही व्यक्तीने पोलीस संरक्षणाकरिता अर्ज केला आणि त्यास संरक्षण असे न होता अर्जदार व्यक्तीच्या ‘मुख्य भीतीचे’ कारणाची शहानिशा करुनच त्याविषयी निर्णय घेतला जातो. वर्गीकृत आणि अवर्गीकृत गटातून संरक्षण दिले जाते. यात पहिल्या गटात एक्स, वाय, झेड आणि झेड प्लस प्रकारचे संरक्षण दिले जाते. तर अवर्गीकृत गटातून सशुल्क व निशुल्क प्रकारातून संरक्षण पुरविले जाते. सशुल्क व निशुल्क या दोन्ही संरक्षण प्रकारात संबंधित व्यक्तीच्या संरक्षणाकरिता १ बंदुकधारी व्यक्तीची नेमणूक केली जाते. सध्या शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती, शिक्षण क्षेत्रातील मोठी व्यक्तिमत्वे, सामाजिक कार्यकर्ते आणि वडिलांच्या जीवाला भीती आहे म्हणून संरक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.  शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक यांना पोलीस संरक्षणाची सेवा पुरवली जाते. हे जरी खरे असले तरी दुसरीकडे हे संरक्षण घेण्याचे ‘फॅड’ सध्या दिसू लागले आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण मिळाल्यास एखाद्या खासगी संस्थेकडून  ‘बाऊंसर’च्या माध्यमातून संरक्षण करुन घेण्याकडे अनेकांचा कल भलताच वाढला आहे. यापूर्वी एखाद्या व्यक्तीला पोलीस प्रोटेक्शन असणे जेवढे दुय्यम समजले जात असे आता मात्र पोलीस प्रोटेक्शन असल्यास ‘सेलिब्रेटी’ असल्याचा ट्रेंड सुरु असल्याचे पाहावयास मिळत आहे. .............................* व्यक्तीला सर्वात धोकादायक कुठली गोष्ट आहे, त्याचा अभ्यास करुन तिला संरक्षण द्यायचे किंवा नाही याचा विचार केला जातो. याकरिता विशेष समिती नेमण्यात आली आहे. आपल्याकडे प्रसिध्दीकरिता, सतत वर्तुळातील चेहरा म्हणून चर्चेत राहण्याकरिता देखील काहीजण सातत्याने संरक्षणाची मागणी करतात. मात्र सरसकट कुणालाही संरक्षण दिले जात नाही. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कारणांचा बारकाईने तपासणी होते. व्यक्तीला देण्यात येणारी सुरक्षा ही त्या व्यक्तीच्या धोक्याच्या स्वरुपावर अवलंबून असते. - अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCelebrityसेलिब्रिटी