शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनो, पिस्तूल शौकिनांवर चाप ओढा

By admin | Updated: August 2, 2014 04:16 IST

पिस्तूल बाळगणे आता काहीजणांचा ‘शौक’ बनला आहे. तर अनेकांकडून केवळ समाजात दहशत निर्माण करण्यासाठी त्याचा वापर होत आहे

मंगेश पांडे, पिंपरीपिस्तूल बाळगणे आता काहीजणांचा ‘शौक’ बनला आहे. तर अनेकांकडून केवळ समाजात दहशत निर्माण करण्यासाठी त्याचा वापर होत आहे. पिस्तूलाचा वापर करुन खंडणीवसुली असो की दमबाजी राजरोसपणे केली जात आहे. विनाकारण पिस्तूल घेवून मिरविणारयांची चाचपणी करुन पोलिसांनी ‘आता बास’ म्हणत दहशत माजविणारयांना चाप ओढण्याची गरज निर्माण झाली आहे. परवानाधारकांव्यतिरिक्त अनेकजण बेकायदारित्या पिस्तूलासह वावरत आहेत. शहरात विविध ठिकाणी कारवाई करुन काहीजणांकडून बेकायदा पिस्तूले जप्त करण्यात आली. मात्र, पिस्तूलाचा धाक दाखवून धमकाविणे आणि गोळीबार अशा घटना थांबलेल्या नाहीत. यासर्व गोष्टी थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे. पिस्तूलाचे नाव काढले तरी सामान्य नागरिकाच्या ह्दयाची धडधड वाढते. केवळ सिनेमात पाहिलेले पिस्तूल सर्रासपणे अनेकजण घेवून मिरवित असतात. स्वसंरक्षणाचे कारण पुढे करुन पिस्तूल बाळगण्याचा परवाना सहजरित्या मिळविला जातो. या पिस्तूलाचा स्वसंरक्षणाऐवजी कमरेला लावून मिरविणे हा अनेकांचा ‘शौक’ बनला आहे. यामुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण होत आहे. शहर व परिसरात जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय जोरात सुरु आहे. अनेकजण या व्यवसायात उतरले असून स्पर्धाही वाढली आहे. या व्यवसायात आपला दरारा राहण्यासाठी अनेकजण पिस्तूल घेवून आपली ‘वेगळी’ ओळख निर्माण करु पाहत आहेत. पिस्तूलाच्या जोरावर अनेक कामे होत आहेत. सहजरित्या परवाना मिळवून पिस्तूल बाळगणारयांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. तसेच बेकायदा पिस्तूल बाळगणारयांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मोहल्ला, गल्लीतील एखाद्या गुन्हेगाराकडेही पिस्तूल असते. छोट्या-मोठ्या चोरीच्या घटनांमध्येही पिस्तूलाचा वापर केला जात आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वारंवार कारवाई करुन पिस्तूल जप्तीची कारवाई केली जाते.