शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या सावकाराला पोलिसांचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 00:42 IST

शासन दरबारी कर्जमाफीचे प्रस्ताव न पाठविता उलट शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून व्याजावर व्याज घेणाऱ्या सावकारांविरोधात शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली.

तुमसर : शासन दरबारी कर्जमाफीचे प्रस्ताव न पाठविता उलट शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून व्याजावर व्याज घेणाऱ्या सावकारांविरोधात शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली. मात्र अजूनपर्यंत सावकाराविरोधात गुन्हे दाखल झाले नाही की त्याची साधी विचारपूसही करण्यात आली नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्यायासाठी जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विनोद पटले (४०) रा.येरली या शेतकऱ्याकडे सामलाटमध्ये ७ एकर शेती आहे. शेतीच्या कामाकरिता पैशाची गरज भासल्याने त्यांनी १७ नोव्हेंबर २०१४ रोजी तुमसर येथील सावकार सुनिल नारायण बडवाईक यांच्याकडे १,३३० ग्रॅम वजनाची सोन्याचे एक साखळी गहाण ठेवून त्यावर २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान सावकाराकडून ते गहाण ठेवलेली साखळी सोडविणे विनोद पटले यांना शक्य झाले नाही. त्यानंतर शासनाने, सन २०१४ मध्ये शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ केले. तसेच कर्जमाफीचे प्रस्ताव सावकारांनी पाठवावे असेही निर्देश दिल्या गेले. सुनिल बडवाईक या सावकाराने मोठ्या शिताफिनी १७ नोव्हेबर २०१४ ला गहान ठेवलेल्या व न सोडविलेली साखळी परत ३० मे २०१५ ला गहान ठेवल्याची पावती शेतकऱ्याच्या हातात दिली. नवीन व्याज आकारणी करून पैसे घेणार असल्याचे पुढे येताच आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याला कळले. (शहर प्रतिनिधी)सदर प्रकाराची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार चौकशी सुरु आहे. अर्जदाराला सावकाराने दिलेल्या पावतीचा नोंद ए.आर. आॅफीसला आहे. आणखीही शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत असून चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.-किशोर गवईपोलीस निरीक्षक, तुमसर.