शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे मन:स्वास्थ्य बिघडले

By admin | Updated: June 12, 2015 06:06 IST

कामाचे अधिक तास, अशातच रजा, सुट्यांचे प्रमाणही कमी. यामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही, तसेच आरोग्यावरही परिणाम होत आहे.

मंगेश पांडे, पिंपरी कामाचे अधिक तास, अशातच रजा, सुट्यांचे प्रमाणही कमी. यामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही, तसेच आरोग्यावरही परिणाम होत आहे. यातून पोलिसांची मानसिकता बदलत असून, ते वरिष्ठांनाच दोषी धरू लागले आहेत. कागदोपत्री रजा, सुट्या असतानाही त्या घेताना मात्र अनेक अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागत आहे. कामाच्या व्यापामुळे पोलिसांची मानसिकता बदलत आहे. सुटी न दिल्याने अधिकाऱ्याला गोळी घालण्याचा प्रकार मुंबईत घडला. या पाठोपाठ भोसरी पोलीस ठाण्यातही रजा नाकारल्याच्या कारणावरून पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुरक्षितता पुरविणारे पोलीसच हक्काच्या रजा, सुट्यांपासून वंचित राहत असल्याचे दिसून येते.बारा तासाची ड्युटी असली, तरी ती चौदा, पंधरा तासांवर जाते. कामाच्या तासांचे प्रमाण नाही. यामुळे पोलिसांना कुटुंबालाही वेळ देणे शक्य होत नाही. त्यांच्यात चिडचिड निर्माण होते. निवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम, नेत्यांचे दौरे, अचानक घडणाऱ्या घटना यामुळे पोलिसांची अक्षरश: पळापळ होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणखीनच अडचणी निर्माण होतात. खाकी वर्दी आणि कायद्याचे रक्षण करण्याची मिळणारी संधी याचा तरुणांमध्ये उत्साह असतो. मात्र, खात्यातील कामाचा ताण आणि कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.इतर विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांच्या रजा सुट्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. सणासुदीला प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी असते. तसेच कामाचे तासही आठच आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हे कामकाज पाहिले जाते. तर, दुसरीकडे पोलिसांना कामाच्या तासाची कसलीही मर्यादा नाही. त्यामुळे पोलिसांमध्ये अस्वस्थता आहे. तासन्तास काम करायचे आणि मनाप्रमाणे सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी पोलीस कर्मचारी करतात. महत्त्वाच्या कामासाठी आणि तातडीच्या वेळेला रजा मागितली जाते. मात्र, वरिष्ठांकडून अनेकदा हवी तशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही. रजा देण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद होण्याचे प्रसंगही घडतात.आठवड्याची सुटी असतानाही बऱ्याचदा ती मिळत नाही. रजा मागणे म्हणजे पोलिसांपुढे मोठे संकट असते. वर्षाला कागदोपत्री सुमारे १२२ रजा आहेत. मात्र, त्या मिळविण्याठीची प्रक्रियाही तितकीच किचकट आहे. रजेसाठी केलेल्या अर्जाची वरिष्ठांकडून दखलही घेतली जात नाही.