शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

तडीपार गुन्हेगारांवर 'फेस रिडिंग अ‍ॅप'द्वारे पोलिसांची नजर; कोरोनाचा संभाव्य धोका देखील टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 21:00 IST

पोलिसांवरील ताण होणार कमी : संपर्काचा धोका टळणार

ठळक मुद्देतडीपार केलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची देखील काळजी या अ‍ॅपचे कामकाज अंतिम टप्प्यात असून,पुढील काही दिवसात ते कार्यान्वित करण्यात येणार

पुणे : शहरातून तडीपार केल्यानंतरही शहरात येऊन गुन्हे करणाऱ्या तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्यक्ष नजर ठेवावी लागत होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गुन्हेगाराच्या घरी जाऊन चेकिंग करणे अवघड होऊ लागल्याने आता शहर पोलीस अशा सराईत गुन्हेगारांवर 'फेस रिडिंग अ‍ॅप' द्वारे नजर ठेवणार आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होणार आहे.  तसेच कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी झाला आहे. होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तीवर पाळत ठेवण्यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.  त्यात काही तांत्रिक बदल करुन आता त्याचा उपयोग गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी केला जाणार आहे.तडीपार गुन्हेगारांना दररोज किंवा पोलीस सांगतील तेव्हा तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा फोटो त्याच्याकडील मोबाईलवरुन अ‍ॅपमध्ये अपलोड करावा लागेल. त्याने फोटो अपलोड केल्यानंतर जीपीएस द्वारे पोलिसांना त्याचे लोकेशन कळेल. तसेच फोटो अपलोड केल्यानंतर तो शहरात आला तर त्याची माहिती तत्काळ पोलिसांना समजेल. त्यामुळे त्याला पकडणे सोपे जाणार आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून होम क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र होमक्वरांटाईन केलेल्या व्यक्ती नियमांचे उल्लंघन करून बाहेर पडत असल्याचे दिसून आले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठीपोलिसांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एच.क्यु.टी.एस. (होम क्वाराटाईन ट्रॅकिंग सिस्टीम) हे अ‍ॅप तयार केले. त्यामध्ये फेस रेडिंग व जीपीएस सुविधेची मदत घेण्यात आली होती. क्वाराटाईन केलेल्या व्यक्तीसत्याच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या व्यक्तीनेदररोज ठरवून दिलेल्या जागेवर जाऊन फोटो काढून (सेल्फी) तो अपलोड करायला सांगितला जात होता. त्यामुळे पोलिसांना जीपीएसच्या मदतीने ती व्यक्ती घरात आहे की नाही हे समजत होते. त्यामुळे क्वारंटाईन व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना खूपच मदत झाली होती. या अ‍ॅपचा आता तडीपार गुंडावर लक्ष ठेवण्यासाठी वापर करण्याचे पोलिसांनी ठरविले आहे.शहर पोलीस दलाकडून सराईत गुन्हेगारांना एक ते दोन वर्षे तडीपार केले जाते़, त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात सोडले जाते. मात्र अनेक गुंड तडीपारीचा भंग करुन शहरात येऊन गुन्हे करत असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम पोलिसांना त्यांच्या घरी जाऊन करावे लागते़ हे काम आता सोपे होणार आहे.तडीपार केलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची देखील काळजी घेण्यात आली आहे. या अ‍ॅपचे कामकाज अंतिम टप्प्यात असून,पुढील काही दिवसात ते कार्यान्वित करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार हे अ‍ॅप सुरू करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी काम करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस