शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पोलीस ७२ तास आॅन ड्युटी, कर्तव्यात पुणे पोलीस झाले पास  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 3:06 AM

शहर नववर्षाच्या स्वागतात दंग असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहर पोलिसांचा बंदोबस्त सुरू झाला़ कोरेगाव भीमा येथील दंगल आणि त्यानंतर शहरात उमटलेले पडसाद, तसेच बुधवारचा महाराष्ट्र बंद यांमुळे गेल्या चार दिवसांत संपूर्ण पोलीस दल तब्बल ७२ तास आॅन ड्युटी होते.

पुणे  - शहर नववर्षाच्या स्वागतात दंग असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहर पोलिसांचा बंदोबस्त सुरू झाला़ कोरेगाव भीमा येथील दंगल आणि त्यानंतर शहरात उमटलेले पडसाद, तसेच बुधवारचा महाराष्ट्र बंद यांमुळे गेल्या चार दिवसांत संपूर्ण पोलीस दल तब्बल ७२ तास आॅन ड्युटी होते़ सायंकाळी ५ नंतर बंद मागे घेण्यात आल्यावर त्यांना काहीसा दिलासा मिळाला़ तरीही, दिवसभरातील घडामोडींचे पडसाद पुन्हा उमटू नयेत,म्हणून रात्रीही बंदोबस्त ठेवण्यात आला होता़नववर्षाच्या स्वागताची तयारी सर्व जण करीत असताना लाखोंच्या संख्येने नागरिक रात्री रस्त्यावर उतरतात़ त्यात अनेक जण मद्य पिऊन हा दिवस साजरा करतात़ पण, त्यानंतर त्यांनी वाहन चालून इतरांना दुखापत करू नये, यासाठी काळजी घेण्याचे काम पोलिसांना करावे लागते़ ३१ डिसेंबरला सर्व जण मध्यरात्री घरी गेले तरी पोलिसांचा बंदोबस्त सोमवारी पहाटे ५ पर्यंत होता़ १ जानेवारीची बहुसंख्यांना सुटी असल्याने अनेक कार्यालयेही बंद होती; त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होती़ यामुळे सकाळी पोलिसांना काहीशी विश्रांती मिळाली़ पण, कोरेगाव भीमा येथे दंगल झाल्याची बातमी दुपारी १२च्या सुमारास शहरात येऊन धडकली़ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचे पडसाद शहरात उमटू नयेत, यासाठी दुपारी १२ पासूनच शहर पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांना अ‍ॅर्लट देण्यात आला़ रस्त्यावरच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली़ त्यामुळे १ जानेवारीला शहर शांत राहिले, तरीही बंदोबस्त सुरुच होता़ २ जानेवारीची सकाळ उजाडली तीच काहीशी तणावाच्या वातावरणात़ शहरातील तरुणांच्या मनात कोरेगाव भीमाच्या घटनेचा राग खदखदत होता़ त्यामुळे शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी पोलीस आयुक्तांसह सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांचा बंदोबस्त जागोजागी ठेवण्यात आला़ तरीही त्यातून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या़ त्यात पीएमपीच्या २२ बसच्या काचा फोडल्या गेल्या़ सायंकाळी परिस्थिती निवळत असल्याचे वाटत असतानाच भारिप-बहुजन महासंघाचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली़ त्याला अन्य संघटनांनी पाठिंबा दिला़ त्यामुळे पुन्हा बंदोबस्त तसाच सुरू राहिला़ मंगळवारी रात्रीपासून दोन शिफ्टमध्ये हा बंदोबस्त सुरू झाला़ स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम व अन्य वरिष्ठ अधिकारी सकाळी साडेसहापासूनच रस्त्यावर उतरले होते़ काही घटना घडण्याची शक्यता असल्याचे समजताच पोलीस अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी तातडीने दाखल होत होते़ तरीही, अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या़

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदPoliceपोलिस