शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर अजित पवारांच्या निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 20:32 IST2022-04-08T20:32:07+5:302022-04-08T20:32:53+5:30
आज एसटी कर्मचाऱ्यांचे सिल्व्हर ओकसमोर आंदोलन

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर अजित पवारांच्या निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्त
बारामती (पुणे) : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थानी एस टी कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत पोलीस प्रशासन सतर्क झाले. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचे निवासस्थान असणाऱ्या सहयोग सोसायटी समोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज अचानक मुंबई या ठिकाणी झालेल्या एसटी कामगारांनी ज्येष्ठ नेते पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी चप्पलफेक आणि दगडफेक देखील करण्यात आली. या आंदोलनानंतर बारामतीत पोलीस सतर्क झाले आहेत.
सहयोग सोसायटी या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या खाजगी निवास्थानी कोणतेही आंदोलन केल्यास ते बेकायदेशीर असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिला आहे.