शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 12:56 IST

गुन्हे शाखेच्यावतीने सोमवारी व मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे ऑपरेशन राबविण्यात आले़.

ठळक मुद्देगुन्हेगारांची झाडाझडती : हॉटेलवर कारवाईरेकॉर्डवरील १६६ सराईत गुन्हेगारांपैकी ८५ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून गुन्हे शाखेच्यावतीने शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांची तपासणी केली़. त्यामध्ये रेकॉर्डवरील १६६ सराईत गुन्हेगारांपैकी ८५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच नोंदणीपुस्तिका अद्ययावत न ठेल्यामुळे ५ हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये १०१ गुन्हेगार आढळून आले नाहीत़. गुन्हे शाखेच्यावतीने सोमवारी व मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे ऑपरेशन राबविण्यात आले़. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सर्व युनिट व अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कासेवाडी, कामगार पुतळा, राजीव गांधी झोपडपट्टीत कारवाई केली. त्यामध्ये ४८ गुन्हेगार तपासले, त्यापैकी २८ जण सापडले. युनिट दोनच्या पथकाने डायस प्लॉट औद्योगिक वसाहत, महर्षीनगर झोपडपट्टीत केलेल्या कारवाईमध्ये १८ पैकी ३ गुन्हेगार सापडले. युनिट तीनने जनता वसाहत, तुकाईनगर परिसरात पाहणी करून २१ पैकी ११  गुन्हेगारांना ताब्यात घेतले. युनिट चारच्या पथकाने लक्ष्मीनगर, येरवड्यातील तपासणीत २१ गुन्हेगारांपैकी १६ जण आढळून आले, तर युनिट पाचच्या पथकाने म्हाडा कॉलनी, रामनगर, आनंदनगर, सुरक्षानगर, बिरासदारनगर, इंदिरानगर, वेताळबाबा झोपडपट्टीत कारवाई केली. २० सराईत गुन्हेगार तपासले. त्यामध्ये ८ जण आढळून आले. दरम्यान, हडपसर पोलिसांच्या हद्दीत एक जण कोयता घेऊन फिरत असल्याची खबर मिळाली. त्यास अटक केली. अमली पदार्थविरोधी पथकाने (पश्चिम) ताडीवाला रस्ता झोपडपट्टीत १६ पैकी ४ गुन्हेगारांना ताब्यात घेतले, तर अमली पदार्थ विरोधी पथकाने (पूर्व) २० गुन्हेगार तपासले. त्यापैकी १५ जण घरी सापडले़  मोकाअंतर्गत पूर्वी केलेल्या कारवाईतील ११ गुन्हेगारांपैकी एक जण आढळून आला, तर एमपीडीए अंतर्गत ५ गुन्हेगार तपासले. ते गुन्हेगार पोलिसांना आढळून आले. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने १९ लॉज तपासले. त्यांना निधी लॉज (हडपसर), अश्विनी लॉज (कात्रज), न्यू रॉयल लॉज (कोंढवा), हॉटेल राज पॅलेस (कोंढवा) व हॉटेल गारवा (कोंढवा) यांनी त्यांच्या लॉजची नोंदणी पुस्तिका अद्ययावत न ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीGanesh Mahotsavगणेश महोत्सव