Police attempt suicide by jumping out of a building over a love affair with a female colleague | खळबळजनक! दिघीत महिला सहकाऱ्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक! दिघीत महिला सहकाऱ्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : महिला सहकाऱ्याशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या वादातून पोलीस शिपायाने ठाण्याच्या इमारतीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी अनिल संपत निरवणे या पोलीस शिपायाविरोधात दिघी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक अशोक भागवत तरंगे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे महिलापोलिसाशी गेल्या दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यावरून त्यांच्यात पोलीस ठाण्यातच वादविवाद झाला. आरोपीने महिलेला आमच्यासमोर जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन दिघी पोलीस ठाण्याच्या टेरेसवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Police attempt suicide by jumping out of a building over a love affair with a female colleague

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.