शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या नंबर प्लेटवरुन पाेलिसांनी शाेधलं संगणक अभियंत्याला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 23:56 IST

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास धडक देऊन पळून गेलेल्या संगणक अभियंत्याचा शोध घेऊन मुंढवा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पुणे : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास धडक देऊन पळून गेलेल्या संगणक अभियंत्याचा शोध घेऊन मुंढवा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.विशाल विजय पवार (वय ३५, रा़ड्रिम्स रागिनी सोसायटी, मांजरी मुळ, रिव्हर व्ह्यु, पालवा, डोंबिवली, मुंबई) असे या संगणक अभियंत्याचे नाव आहे. तो मगरपट्टा येथील इन्फाेसिस कंपनीमध्ये सहायक व्यवस्थापक म्हणून नोकरी करीत आहे.     अपघातग्रस्तांना मदत करा. त्यांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचा प्राण वाचवू शकतो, असे सर्व माध्यमातून सांगितले जाते. पण, संगणक अभियंता असलेल्या या तरुणावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. याबाबत मुंढवा पोलिसांनी सांगितले की, गोविंद कुंडलिक जाधव (वय ६०, रा़ वडबन श्रीकृष्ण सोसायटी, मुंढवा) हे आपल्या कुत्र्यासह मॉर्निंग वॉकला जात होते. झगडे पार्कसमोरील रस्त्यावरील शर्ली शोरुमसमोर आले असताना कोरेगाव पार्क करुन मुंढवाकडे येणाऱ्या भरधाव कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यात ते जबर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. त्यांचा कुत्राही जखमी झाला.मात्र, हा संगणक अभियंता अपघातानंतर न थांबता पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक अमित वाळके यांनी घटनास्थळाला भेट दिली. तेथे कारची नंबरप्लेट मिळून आली. त्यावरुन त्यांनी विशाल पवार याचा डोंबिवलीचा पत्ता शोधून काढला. मात्र, तो तेथे रहात नसल्याचे आढळून आले. त्याचा शोध घेऊन त्याला मांजरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानेच अपघात केल्याचे निष्पन्न झाल्याने पवार याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित वाळके, पोलीस नाईक निलेश गायकवाड, शिपाई शाम शिंदे, गणेश भापकर यांनी हा तपास केला. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूITमाहिती तंत्रज्ञान