इंदापूर येथे २५ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 20:13 IST2019-03-15T20:09:08+5:302019-03-15T20:13:10+5:30

आरोपीने तक्रारदार यास पैसे घेऊन प्रथम इंदापूर पोलीस ठाण्यासमोर बोलावून घेतले.

police arrested in case of accepting a bribe of 25,000 in Indapur | इंदापूर येथे २५ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी जाळ्यात 

इंदापूर येथे २५ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी जाळ्यात 

ठळक मुद्देपुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई, गुन्हा दाखल पोलीस ठाण्यासमोरच घेतले ताब्यात 

इंदापूर : तक्रारदार यांच्या भावासह इतर तीन जणांवर गुन्हा इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्याला जामीनदार मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आरोपी राहुल बडे यांनी २५ हजारांची लाच मागितली. ती स्वीकारल्यानंतर सापळा रचलेल्या पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली. 
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १५) दुपारी १.३० वाजता इंदापूर शहरातील प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलजवळ तक्रारदार यांच्याकडून आरोपी राहुल दत्तात्रय बडे (वय ३०, पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर २५००, रा. बाब्रस मळा, लेन नंबर ६ तिरुपती अपार्टमेंट, इंदापूर, मूळ गाव  माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. 
आरोपीने तक्रारदार यास पैसे घेऊन प्रथम इंदापूर पोलीस ठाण्यासमोर बोलावून घेतले. त्यांनतर त्याला स्वत:च्या बुलेट गाडीवर घेऊन इंदापूर शहराच्या आडबाजूला प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलच्यासमोर घेऊन गेला व त्याच्याकडून २५ हजार रुपये स्वीकारून तक्रारदाराला तेथेच सोडून इंदापूर पोलीस ठाण्याकडे निघून आला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना इंदापूर पोलीस ठाण्यासमोर तपासले असता त्यांच्या बुलेट गाडीच्या डिक्कीमध्ये २५ हजारांची रक्कम आढळून आली व त्यांना जागीच चौकशीसाठी पथकाने ताब्यात घेतले व रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. 
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस निरीक्षक घार्गे, सहायक पोलीस निरीक्षक ढवणे, पोलीस नाईक कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल म्हेत्रे यांनी केली. या कारवाईसाठी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी सहकार्य केले. 
____________________________________________

Web Title: police arrested in case of accepting a bribe of 25,000 in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.