शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर; तरुणीला पोलिसांनी केली अटक  

By नितीश गोवंडे | Updated: December 27, 2024 19:36 IST

मेफेटरमाईन सल्फेट या औषधाच्या १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या.

पुणे : वेदनाशामक, तसेच भुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. बेकायदा औषधांची विक्री करणाऱ्या एका तरुणीला हडपसर पोलिसांनीअटक केली. तिच्याकडून एक लाख रुपयांच्या मेफेटरमाईन सल्फेट औषधाच्या (टर्मिन) १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अंबिका उर्फ नेहा आनंदसिंह ठाकूर (२६, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिसांचे पथक गुरुवारी (दि. २६) गस्त घालत होते. त्यावेळी हडपसर भागात राहणारी अंबिका ठाकूर ही वेदनाशामक, तसेच भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून मेफेटरमाईन सल्फेट या औषधाच्या १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या.अंबिका ठाकूर हिच्याकडे औषध विक्रीचा परवाना नाही, तसेच तिच्याकडे औषधनिर्मिती अभ्यासक्रमाची (फार्मसी) पदवी नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाचा वापर केल्यास दुष्परिणाम होतात, तसेच औषधाचे सेवन करणाऱ्याच्या आरोग्यास गंभीर इजा पोहोचू शकते. ठाकूरला याबाबतची माहिती होती. हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, नीलेश किरवे, गायत्री पवार यांनी ही कामगिरी केली. चारशे ते पाचशे रुपयांना विक्री...अंबिका ठाकूर ही नशा करायची. तिने यापूर्वी व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले होते. त्यानंतर तिने नशेसाठी औषध विक्री सुरू केली. औषधाच्या बाटलीची ती चारशे ते पाचशे रुपयांना विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाची विक्री, तसेच सेवन करण्यास बंदी आहे. तिने औषधांच्या बाटल्या कोठून आणल्या, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. यापूर्वी पोलिसांनी नशेसाठी औषधांचा वापर, तसेच विक्रीचे प्रकार उघडकीस आणले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयmedicineऔषधंDrugsअमली पदार्थArrestअटक