शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

जे न देखे रवि ते देखे कवी..;१९९१ साली प्रसिद्ध झालेली 'टीव्हीवरची शाळा' कविता होतेय प्रचंड व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 14:21 IST

१९९१ साली प्रसिद्ध झालेल्या एका कवितेत 'ऑनलाईन' शाळेची धमाल केली होती शब्दबद्ध...

ठळक मुद्देकवी राम अहिवळे यांनी केलेली ही बाल कविता किशोर मासिकाच्या १९९१ सालच्या अंकात प्रसिद्ध

लक्ष्मण मोरे

पुणे : मुलांना ऑनलाईन शाळा शिकावी लागेल, मोबाईल अथवा टीव्हीच्या स्क्रीनवर पाहून मुले धडे गिरवतील असे कधी कुणाच्या स्वप्नीही आले नसेल. तसा विचार जर कोणी २५-३० वर्षांपूर्वी मांडला असता तर त्याला लोक 'वेडा' म्हणाले असते. अशाच एका वेड्या कवीची एक कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 'टीव्हीवरची शाळा' असे या कवितेचे नाव असून १९९१ सालच्या किशोर मासिकात ही कविता प्रसिद्ध झाली होती. 

सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वत्र लॉकडाऊनमुळे एक प्रकारचे शैथिल्य आले आहे. नोकरी, व्यवसाय, धंदे आणि उद्योग बंद आहेत. त्याला, शाळा आणि महाविद्यालयेही अपवाद राहिलेली नाहीत. मुलांच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. शाळांकडून मोबाईलवर शैक्षणिक व्हिडीओ पालकांना पाठविले जात आहेत. पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ अथवा ऑनलाईन स्क्रीनवर मुले आपल्या नव्या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम शिकत आहेत. हे सर्व प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींना ऑनलाईन शाळेचे 'गणित' अद्यापही रुचत नसले तरी ती आजची आवश्यकता बनून राहिली आहे. 

सध्या भरणाऱ्या ऑनलाईन शाळेचा गंमतशीर विचार एका कवितेमधून १९९१ साली मांडण्यात आला होता. कवी राम अहिवळे यांनी केलेली ही बाल कविता किशोर मासिकाच्या १९९१ सालच्या डिसेंबर महिन्याच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. जर घरातल्या टीव्हीवर शाळा भरली तर किती धमाल येईल, मुले किती आनंदी होतील, डोके नवे कॉम्प्युटर होईल, गणिताचा कसा धुव्वा उडेल, विविध विषयांच्या टीव्हीवर मालिका दाखविल्या जातील अशा कल्पना मांडून मुलांचे रंजन करण्याचा प्रयत्न या कवितेमधून करण्यात आलेला आहे. टीव्हीवरच्या शाळेत ना अभ्यास, ना गृहपाठ गण्यासारख्या कविता होतील पाठ असे सांगत सिनेमासारखी अवघी तीन तासांची शाळा भरेल आणि सर्वजण पहिल्या क्रमांकाने पास होतील असे गमतीने म्हटले असले तरी तेच चित्र आज प्रत्यक्षात पहायला मिळते आहे. टीव्हीवरच्या शाळेत खूप मजा येईल, पण खेळाच्या तासाचे कसे काय होईल या प्रश्नाने कवितेचा झालेला शेवटही आजच्या 'ऑनलाईन शाळे'ला तंतोतंत लागू पडतो. आजच्या परिस्थितीशी सुसंगत आणि अगदी चपखल बसणारी ही कविता प्रचंड व्हायरल झाली असून तीस वर्षांपूर्वीची बाल कल्पना कोरोनाच्या निमित्ताने आज प्रत्यक्षात उतरली आहे. ----------किशोर मासिकाच्या १९९१सालच्या डिसेंबर महिन्याच्या अंकात कवी राम अहिवळे यांची ही कविता प्रसिद्ध झाली होती. तब्बल २८ वर्षानंतर ही कविता कालसुसंगत भासत असल्याने प्रचंड व्हायरल झाली आहे. मला शेकडो लोकांकडून राज्य भरातून ही कविता व्हॉट्सअपवर आली. आम्ही कवी राम अहिवळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांचा पत्ता व दूरध्वनी उपलब्ध होत नाहीये. - किरण केंद्रे, कार्यकारी संपादक, किशोर मासिक

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण