शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पीएमपीचे देखभाल-दुरूस्तीचे पितळ उघडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 6:30 PM

पेट्रोलियम कन्झरर्वेशन रिसर्च असोसिएशनच्या टीमने मागील सहा महिने सुमारे १६० बसची देखभाल व प्रशिक्षणाचे काम हाती घेतले होते.

ठळक मुद्दे‘पीसीआरए’ ही केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था टीमला मार्केटयार्ड व कात्रज आगारातील अनुक्रमे ७५ व ८५ आगारांची जबाबदारीबसच्या देखभाल-दुरूस्तीत ‘पीएमपी’ मागे पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी अनेकदा केले मान्य या प्रयोगाने ब्रेकडाऊन कमी होण्याबरोबरच मार्गावरील बससंख्याही वाढल्या

पुणे : देखभाल-दुरूस्ती, चालक, मेकॅनिक प्रशिक्षणानंतर बसची स्थिती सुधारू शकते, यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) राबविलेल्या प्रयोगानेच शिक्कामोर्तब केले आहे. पेट्रोलियम कन्झरर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए)च्या टीमने मागील सहा महिने सुमारे १६० बसची देखभाल व प्रशिक्षणाचे काम हाती घेतले होते. त्यामुळे तब्बल २० लाख रुपयांचा इंधनाचा खर्च वाचला आहे. या प्रयोगामुळे पीएमपीचे देखभाल-दुरूस्तीचे पितळ उघडे पडले आहे.   ‘पीसीआरए’ ही केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालय आणि जागतिक बँकच्या सहकार्याने देशात एनर्जी सेक्टर मॅनेटमेंट असिसिटंन्स प्रोग्रॅम (ईएसएमएपी) हा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जागतिक बँकेने अर्थसहाय्य केले आहे. या कार्यक्रमांतर्गत ‘पीएमपी’ची निवड करण्यात आली आहे. बसची देखभाल-दुरूस्ती, चालक, मेकॅनिक व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण करून इंधन बचत करण्यासाठी ‘पीसीआरए’ अधिकारी मागील सहा महिन्यांपासून पुण्यात आहे. या टीमला मार्केटयार्ड व कात्रज आगारातील अनुक्रमे ७५ व ८५ आगारांची जबाबदारी देण्यात आली होती. या सर्व बस ९ ते १० वर्ष जुन्या होत्या.   मागील सहा महिने त्यांनी या बसची देखभाल-दुरूस्तीवर लक्ष केंद्रीत केले होते. इंधन बचतीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी निवड चालक, मेकॅनिक, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. संबंधित बसची प्रति लिटर धाव वाढल्याने इंधनात बचत होऊ लागली आहे. मागील सहा महिन्यांत मार्केटयार्ड व कात्रज आगारात अनुक्रमे ११ व ९ लाखांचा इंधनाचा खर्च वाचला आहे, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली. त्यांच्या प्रयत्नातून हा प्रयोग राबविण्यात येत आहे. पुढील सहा महिने कोथरूड, हडपसर, पुणे स्टेशन, स्वारगेट या चार आगारांमध्येही ही टीम काम करणार आहे.   ------------------------  बसच्या देखभाल-दुरूस्तीत ‘पीएमपी’ मागे पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी अनेकदा मान्य केले आहे. जुन्या बसमुळे देखभाल करण्यात अडचणी येतात, असे त्यांचे म्हणणे असते. पण ‘पीसीआरए’च्या टीमने ९ ते १० वर्ष जुन्या बसची जबाबदारी स्वीकारूनच इंधन बचत केली आहे. या प्रयोगाने ब्रेकडाऊन कमी होण्याबरोबरच मार्गावरील बससंख्याही वाढल्या. त्यामुळे पीएमपीकडून देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.  ----------------  

खबरदारी हीच सुरक्षितता.......... 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे