शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीला लालफितीचा कोट्यवधींचा भुर्दंड

By admin | Updated: May 20, 2015 01:01 IST

शंकरशेठ रस्त्यावरील पीएमटी बिल्डिंगमध्ये असलेल्या आयकर कार्यालयाशी भाडेकरार करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) तब्बल १२ वर्षांपासून ‘तप’स्या सुरू आहे.

आयकर कार्यालयास १२ रुपये दराने जागा : भाडेकरारासाठी सुरू आहे ‘तप’स्याराजानंद मोरे ल्ल पुणेशंकरशेठ रस्त्यावरील पीएमटी बिल्डिंगमध्ये असलेल्या आयकर कार्यालयाशी भाडेकरार करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) तब्बल १२ वर्षांपासून ‘तप’स्या सुरू आहे. पीएमपीशी सुधारित भाडेकरार करण्यासाठी आयकर कार्यालयाने सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेशनला (सीबीडीटी) सादर केलेला प्रस्ताव लालफितीत अडकल्याचे सध्याचे चित्र आहे. पीएमपीला दरमहा केवळ ११.६९ रुपये प्रतिचौरस फूट या जुन्या भाड्याप्रमाणे भाडे मिळत असल्याने कोट्यवधी रुपयांपासून वंचित राहावे लागत आहे.‘पीएमपी’ने मालकीचे विविध आकाराचे ९० गाळे भाडेकराराने खासगी तसेच शासकीय संस्थांना दिले आहेत. काही संस्थांशी ९९ वर्षांचे, ३० वर्षांचे आणि १० वर्षांचे करार केले आहेत. करार संंपल्यानंतर सुधारित भाडे आकारून पुन्हा करार केला जातो. शंकरशेठ रस्त्यावर ‘पीएमटी बिल्डिंग’मध्ये आयकर विभागाचे कार्यालय आहे. सुमारे ६० हजार चौरस फूट जागेत हे कार्यालय आहे. या जागेचा करार दरमहा ११.६९ प्रतिचौरस फूट या दराने झाला आहे. पूर्वीच्या कराराची मुदत २००३ पर्यंत संपत होती. त्या वेळी पीएमपी प्रशासनाने नवीन करारासाठी महापालिकेडून जागेचे मूल्यांकन करून सुधारित भाड्याचा प्रस्ताव विभागाला दिला. त्यानुसार विभागाने नवीन करार करण्यासाठी सुधारित भाडे मान्य करणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप याला मंजुरी मिळालेली नाही. जुन्या भाड्याप्रमाणेच दरमहा सुमारे ७ लाख रुपयांचे भाडे पीएमपीला सध्या मिळत आहे. पीएमपी प्रशासनाने आयकर विभागाशी या बाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप करार होऊ शकलेला नाही. त्यामुळे पीएमपीला दरमहा लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. आयकर विभाग केंद्र सरकारचा असल्याने पीएमपी प्रशासनानेही काही काळ वाट पाहिली. मात्र, पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी कार्यालयाला सुधारित भाडेकरार करण्याबाबत नोटीस बजावली होती. भाडेकरार करावा अथवा जागा रिकामी करावी, असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले होते. त्यावर विभागाने ‘सीबीडीटी’कडे याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. आयकर विभागाला भाडेकरारासाठी ‘सीबीडीटी’ मंजुरी आवश्यक आहे. कार्यालयानेही मागील काही वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. जुन्या कराराची मुदत संपल्यानंतर महापालिकेच्या शहर अभियंत्याकडून जागेचे मूल्यांकन करून नवीन करारासाठी आयकर विभागाला काही वर्षांपूर्वीच प्रस्ताव दिला आहे. विभागाने हा प्रस्ताव मान्यतेसाठी ‘सीबीडीटी’कडे सादर केला आहे. त्यांचाही सुधारित भाडे करारासाठी प्रयत्न सुरू आहे. सुधारित भाडेकरार झाल्यानंतर २००३ पासून भाडे देण्याचेही विभागाने मान्य केले आहे. सध्या जुन्या कराराप्रमाणेच भाडे मिळत आहे.- डॉ. प्रवीण अष्टीकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी