शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

मुंबईच्या बेस्ट एसी बसपेक्षाही पुण्याची पीएमपी महागडी  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 7:34 PM

शहरातील पीएमपीच्या वातानुकूलित बसचा प्रवास साध्या बसच्या तिकीट दरातच होत असला तरी हे दरही मुंबईतील बेस्टच्या दरांपेक्षा अधिक झाले आहेत.

पुणे : शहरातील पीएमपीच्या वातानुकूलित बसचा प्रवास साध्या बसच्या तिकीट दरातच होत असला तरी हे दरही मुंबईतीलबेस्टच्या दरांपेक्षा अधिक झाले आहेत. पुण्यात पहिल्या २ किलोमीटर अंतरासाठी ५ रुपये मोजावे लागत आहेत. तर बेस्टला पहिल्या पाच किलोमीटरसाठी ५ रुपये द्यावे लागतात. बेस्टच्या एसी बसमधून १५ किलोमीटर प्रवास केला तर केवळ १९ रुपये तिकीट आहे. तर पीएमपीच्या साध्या बसमधून १४ किलोमीटरसाठी २० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत बेस्टपेक्षा पीएमपीचा प्रवास महागडा ठरत आहे.   

मुंबई महापालिकेने नुकतीच बेस्टच्या बससेवेच्या तिकीट दरात जवळपास निम्म्याने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभुमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) मार्फत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह लगतच्या भागात सुरू असलेल्या बससेवेच्या तिकीट व पास दराचा आढावा घेण्यात आला. नवीन दरांमुळे पुण्यातील प्रवाशांचा प्रवास बेस्टच्या प्रवासापेक्षा महागडा झाल्याचे दिसून आले आहे. नवीन रचनेनुसार बेस्टने प्रत्येक पाच किलोमीटरचे टप्पे निश्चित करून त्यानुसार पाच रुपयांच्या पटीतच तिकीट दर ठेवले आहेत. पहिल्या पाच किलोमीटरसाठी ५ रुपये तिकीट दर आहे. तर पुढील पाच किलोमीटरसाठी केवळ दहा रुपये मोजावे लागत आहेत. एसी बसचे दरही अत्यंत माफक आहेत. पहिल्या दहा किलोमीटरसाठी केवळ १३ रुपये द्यावे लागतात.  

पीएमपीची सेवा मात्र बेस्टच्या तुलनेत महागडी ठरत आहे. तिकीट दराची रचना प्रति दोन किलोमीटरनुसार पाच रुपयांच्या पटीत आहे. त्यामुळे टप्प्याटप्याने प्रति २, ४ व ६ किलोमीटरच्या अंतराने दर बदलत जातात. साध्या बसचे पहिल्या १० किलोमीटरचे तिकीट दर १५ रुपये असून हे दर मुंबईतील एसी बसपेक्षा २ रुपयांनी अधिक आहेत. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या एसी ई-बस साठी साध्या बसचाच तिकीट दर ठेवण्यात आला आहे.  पण हा दर बेस्टच्या एसी बसपेक्षा अधिक आहे. एसीपीएमपीने ६० किलोमीटरपर्यंत तिकीट दर निश्चित केले असून त्यासाठी ६० रुपयेच दर आहे. त्यानुसार पुण्यातील जवळच्या अंतराचा प्रवास अधिक महागडा ठरत आहे. तर अंतर जसे वाढत जाईल, त्यानुसार तिकीट दर कमी होत गेला आहे.   पासच्या दरातही मोठी तफावतबेस्टचे तिकीट दर कमी झाल्याने पास दरातही मोठी कपात झाली आहे. बेस्टचा साध्या बसचा दैनंदिन पास ५० रुपये तर एसी बसचा ६० रुपये आहे. पण पुण्यात त्यासाठी ७० रुपये मोजावे लागतात. बेस्टचे मासिक पासचे दर २५० ते १ हजार रुपये आहेत. तर पुण्यात हा दर १४०० रुपये एवढा आहे. बेस्टे विद्यार्थी पासचे दरही २०० ते ३५० रुपयांच्या दरम्यान आहेत. पीएमपीचा सर्व मार्गांसाठीचा ७५० रुपयांचा पास आहे. तर मार्गनिहाय पंचिंग पाससाठी तिकीट दरात एका बाजूने ५० टक्के सवलत दिली जाते. म्हणजे एका बाजूने १० रुपये तिकीट असल्यास मासिक पाससाठी ३०० रुपये द्यावे लागतात. अंतर वाढत गेले की पासचा दर वाढत जातो.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलBESTबेस्टTrafficवाहतूक कोंडीPuneपुणेMumbaiमुंबई