PMPML| नोकरीची संधी! पीएमपी लवकरच करणार २ हजार वाहकांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 13:10 IST2022-08-15T13:06:05+5:302022-08-15T13:10:02+5:30
आगामी काळात २ हजार चालक-वाहकांची भरती...

PMPML| नोकरीची संधी! पीएमपी लवकरच करणार २ हजार वाहकांची भरती
पुणे : पीएमपी प्रशासन लवकरच त्यांच्याकडील वाहकांची कमतरता लक्षात घेत, २ हजार बदली, हंगामी, रोजंदारी पद्धतीने कंडक्टरची (वाहक) भरती करणार आहे. पीएमपीत वाहकांची मोठी कमतरता असल्यामुळे पीएमपीने त्यांच्याकडील चालकांना वाहक बनवले आहे.
याच पार्श्वभूमीवर पीएमपीकडून आगामी काळात २ हजार चालक-वाहकांची भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता पीएमपी आता लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार आहे. यामुळे शहरातील २ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे.
वाहक भरती प्रक्रियेसंदर्भात पीएमपी लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार असून, नागरिकांना याची अधिकृत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भरतीसंदर्भात कोणत्याही एजंट अथवा काम करून देतो, असे सांगणाऱ्या व्यक्तीला भेटू नये किंवा आर्थिक देवाण-घेवाण करू नये, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
आमच्याकडे वाहकांची मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे आम्ही ६०० चालकांना वाहक बनवले आहे, तर आगामी काळात २ हजार वाहकांची भरती करण्याचे आमचे नियोजन आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे.
- दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी