PMPML | पीएमपीच्या काही बसमार्गांच्या वेळेत बदल; शहरासह ग्रामीण मार्गांवर अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 10:34 IST2023-02-28T10:33:23+5:302023-02-28T10:34:46+5:30
रिकाम्या बस धावत असल्याने निर्णय...

PMPML | पीएमपीच्या काही बसमार्गांच्या वेळेत बदल; शहरासह ग्रामीण मार्गांवर अंमलबजावणी
पुणे : पीएमपी प्रशासनाने नियमित सुरू असलेल्या बसच्या काही मार्गांवर सकाळच्या आणि संध्याकाळच्या सुमारास बस रिकाम्या धावत असल्याने मार्गांच्या वेळेमध्ये बदल केले आहेत. याची अंमलबजावणी पीएमपीच्या शहरासह ग्रामीण भागाच्या मार्गांवर सुरू करण्यात आली आहे.
पीएमपी प्रशासनाने उत्पन्न आणि प्रवासी वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील १५ डेपोअंतर्गत असलेल्या मार्गांची पाहणी करून हा निर्णय घेतला. शहरासह ग्रामीण भागातील काही मार्गांवर पहाटेच्या सुमारास अजिबात प्रवासी उपलब्ध होत नव्हते. तशीच स्थिती रात्री उशिराच्या वेळीदेखील होती. प्रशासनाने केलेल्या पाहणीदरम्यान असे काही मार्ग निदर्शनास आले. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागासह शहरातील पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेस आणि रात्री उशिराच्या वेळेस प्रवाशांना बसची वाट पाहावी लागणार आहे.