शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटामुळे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या पीएमपीला 'बाप्पा' पावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 12:21 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपी बस सेवा सुरू करण्याबाबत तत्वतः मान्यता दिल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवाच्या एक -दोन दिवस आधी किंवा गणेशोत्सव मध्ये बस धावण्याची शक्यतापुणे व पिंपरी चिंचवड मधील बहुतेक सर्व दुकाने, मॉल, कार्यालये सुरू सध्या अत्यावश्यक सेवेच्या बस, रिक्षा, कॅब मध्ये जेष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील मुलांना बंदी

पुणे : मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस सेवा गणेशोत्सवात सुरू होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बस सेवा सुरू करण्याबाबत होकार दिल्याचे समजते. त्यानुसार सुरुवातीला काही ठराविक मार्गांवर 450 बस मार्फत सेवा देण्याचे नियोजन पीएमपी प्रशासनाकडून केले जात आहे. कोरोना संकटामुळे 25 मार्चपासून पीएमपीची बस सेवा ठप्प आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 125 बस मार्गावर धावत आहे.

लॉकडाऊनपूर्वी मिळणाऱ्या सुमारे दीड कोटी रुपयांच्या उत्पनावर पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे पीएमपी ची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत. सुमारे पाच हजार कर्मचारी दोन्ही पालिकांकडे वर्ग केले आहेत. ही स्थिती सुधारण्यासाठी बस सेवा सुरू करणे आणि दोन्ही पालिकांकडून आर्थिक मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी शुक्रवारी अजित पवार यांची भेट घेतली. बैठकीत पवार यांनी बस मार्गावर येण्यासाठी तत्वतः मान्यता दिल्याचे समजते. दोन्ही महापालिका आयुक्त व जगताप यांच्या बैठकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल. जगताप यांनीही माध्यमांशी बोलताना याला दुजोरा दिला आहे. मार्ग व बस संख्या तसेच याबाबतची नियमावली अंतिम केली जाईल. गणेशोत्सवाच्या एक -दोन दिवस आधी किंवा गणेशोत्सव मध्ये बस धावण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पीएमपी कडून प्रवाशांची अधिक मार्ग असलेले 30 मार्ग निवडले जाण्याची शक्यता आहे. हे मार्ग वाढुही शकतात. मात्र कोरोनाची भीती कायम असल्याने केवळ ताफ्यातील 25 टक्के म्हणजे जवळपास 450 बस मार्गावर आणण्याची प्रशासनाची तयारी आहे. याबाबत जगताप आणि बैठकही घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ----------------- पुणे व पिंपरी चिंचवड मधील बहुतेक सर्व दुकाने, मॉल, कार्यालये सुरू झाली आहेत. यातील अनेक कर्मचारी पीएमपी प्रवास करायचे. पण सध्या बस बंद असल्याने त्यांचे हाल होत आहेत. सेवा आणखी काही काळ बंद राहिल्यास हे प्रवासी दुरावण्याची भीती आहे.

----------------

जेष्ठ नागरिकांचे काय?

सध्या अत्यावश्यक सेवेच्या बस, रिक्षा, कॅब मध्ये जेष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील मुलांना प्रवास करण्यास बंदी आहे. पण अनेक जेष्ठ नागरिकांना विविध ठिकाणी कामानिमित्त बाहेर पडावे लागते. त्यांना बस मध्ये प्रवेश देण्याची मागणी केली जात आहे. ----------------- दोन्ही पालिका आयुक्तांशी बोलणे झाले आहे. बस सेवा 22 तारखेला किंवा त्यापूर्वी सुरू करण्याबाबतचा निर्णय मंगळवारी घेतला जाऊ शकतो.- राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलAjit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर