शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीला हवाय मेट्रो, पीएमआरडीएचा आर्थिक आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 20:50 IST

पुणे व पिंपरी चिंचवडशी जोडण्यासाठी विविध भागात बससेवा सुरू करण्याचे नियोजन

ठळक मुद्देपीएमपीकडून मेट्रोकडून तयार करण्यात आलेल्या फिडर मार्गावर सेवा देण्यात येणार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बससेवेची हद्द विस्तारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत नव्याने अनेक मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न असून त्यासाठी अतिरिक्त निधीसाठी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरांतर्गत एकात्मिक वाहतुक धोरणाच्या अनुषंगाने पुणे मेट्रो, स्मार्ट सिटीकडूनही पीएमपीला निधीचा हातभार हवा आहे.

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी पीएमपीच्या नियोजन योजनांसह विविध मागण्या विभागीय आयुक्त व पुणे युनिफाईड मेट्रो पोलिटन ट्रान्सपोर्ट अ‍ॅथोरिटी (पुमटा) कडे केल्या आहेत. याबाबत बुधवारी झालेल्या बैठकीत जगताप यांनी सादरीकरण केले. ‘पीएमपीआरडीए’चे क्षेत्र सुमारे सात हजार चौरस किलोमीटर एवढे आहे. हा भाग पुणे व पिंपरी चिंचवडशी जोडण्यासाठी विविध भागात बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने काही मार्ग १२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. शिक्रापुर, चºहोली, वडगावशिंदे, मांजरी खुर्द, केसनंद, चांदे, नांदे आदी भागात बससेवा सुधारण्याची गरज असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. तसेच औद्योगिक परिसरातही बससेवा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे जगताप नमुद केले आहे.

बससेवाचा विस्तार करण्यासाठी आळंदी, चाकण एमआयडीसी, रांजणगाव, वाघोली, सासवड, डोणजे किंवा धायरी, उरळी कांचन व कापुरहोळ यांसह, पौड, कामशेत, तळेगाव दाभाडे आदी भागात आगारांची गरज आहे. यासाठी जागा आरक्षित करून पीएमपीला संचलन तुट मिळण्यासह नियोजन करण्याची विनंती करण्यात आली आहे. पीएमपीकडून मेट्रोकडून तयार करण्यात आलेल्या फिडर मार्गावर सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक बससाठी आर्थिक सहाय्य व संचलन तुट महामेट्रोकडून मिळावे, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली आहे.--------------------------------पीएमआरडीए हद्दीत बससेवा वाढविण्यास मान्यता मिळाली आहे. या हद्दीत बससेवा सुरू असताना संचलनातील तुट मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बस आगारांसाठी आरक्षित जागांचीही मागणी करण्यात आली आहे. याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे.- राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपी

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलPMRDAपीएमआरडीएMetroमेट्रो