सवाई गंधर्व महोत्सवासाठी ‘पीएमपी’कडून रात्री बससेवा; जादा तिकीट दर आकारला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:55 IST2025-12-10T19:54:25+5:302025-12-10T19:55:00+5:30
१० ते १२ आणि १४ डिसेबरला रात्री साडेदहा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटतील. तर, १३ डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटणार आहेत

सवाई गंधर्व महोत्सवासाठी ‘पीएमपी’कडून रात्री बससेवा; जादा तिकीट दर आकारला जाणार
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी १० ते १४ डिसेंबरदरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथून विशेष बस सोडण्यात येणार आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी जाणाऱ्या श्रोत्यांसाठी कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या सोयीसाठी ‘पीएमपी’कडून जादा तिकीट दर आकारला जाणार आहे. १० ते १२ आणि १४ डिसेबरला रात्री साडेदहा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटतील. तर, १३ डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटणार आहेत. या बससेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ‘पीएमपी’कडून करण्यात आले आहे.
असे आहेत विशेष बसचे मार्ग
मुकुंदनगर ते निगडी भक्ती-शक्ती : दांडेकर पूल, डेक्कन, वाकडेवाडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड स्टेशन
मुकुंदनगर ते धायरी मारुती मंदिर : दांडेकर पूल, विठ्ठलवाडी, आनंदनगर, वडगाव फाटा, धायरी गाव
मुकुंदनगर ते कोथरूड डेपो : टिळक रोड, डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, जयभवानीनगर, वनाज कंपनी
मुकुंदनगर ते वारजे माळवाडी : डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, कोथरूड स्टॅण्ड, गांधी भवन, कर्वेनगर