शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पीएमपीच्या वाहकाने अंध विद्यार्थ्याला केली मारहाण, शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 15:12 IST

पांडुरंग रामचंद्र खरसळे हा विद्यार्थी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेत आहे. सकाळी सव्वादहा वाजता तो मित्राला भेटण्यासाठी चिंचवडकडे निघाला होता.

चिंचवड: पुणे विद्यापीठावरून चिंचवडकडे प्रवास करत असणाऱ्या एका अंध विद्यार्थ्याला पीएमपीएनएलच्या वाहकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी या अंध विद्यार्थ्याने चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पांडुरंग रामचंद्र खरसळे हा विद्यार्थी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेत आहे. सकाळी सव्वादहा वाजता तो मित्राला भेटण्यासाठी चिंचवडकडे निघाला होता. हडपसर कडून चिंचवडकडे जाणाऱ्या बसने त्याने प्रवास सुरु केला. त्याच्याकडे असणारा बस पास होस्टेलवर राहिल्याने त्याने तिकिटासाठी वाचकाला दोन हजाराची नोट दिली. वाहकाने सुट्टे पैसे देण्याची मागणी केली. मात्र, सुट्टे पैसे नसल्याने मला उर्वरीत पैसे चिंचवडला बस गेल्यानंतर द्या, असे सांगितले. मात्र, संतप्त झालेल्या वाहकाने तुम्ही अंध व्यक्ती कायमच फुकट फिरत असल्याचे म्हणत अश्लील शब्दात शिवीगाळ केली. या बाबत पांडुरंग याने विचारपूस केली असता या वाहकाने त्याला मारहाण करत तोंडावर दोन चापट लागवल्या.

तुम्हाला तिकीट द्यायचे नसेल तर मी तपासणी करणाऱ्यांकडे दंड भरेल. मात्र तुम्ही मारहाण करू नका, असेही पांडुरंग याने सांगितले. मात्र, या वाहकाने उद्धट वर्तवणूक करत अपशब्द वापरले. झालेला प्रकार पांडुरंगने चिंचवडमधील त्याच्या दृष्टिहीन मित्रास सांगितला. बस चिंचवडला आल्यानंतर प्रशासनाच्या कार्यलयात मारहाण केल्याचा जाब विचारात तक्रार करण्यासाठी दोघेही गेले. मात्र, त्यांनाच इतर उपस्थित कर्मचारीही व्यवस्थित वागणूक देत नव्हते. या वेळी या दोघांनी मित्र परिवाराला घटनास्थळी बोलविले. वाहकाने माफी मागत काढता पाय घेतला. मात्र, पांडुरंगने या बाबत चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. चिंचवड पोलिसांनी या घटनेबाबत विचारपूस करत प्रमोद मालुसरे  (बॅच नंबर ४४४७) या वाहकावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक एस.ए.डिगे करीत आहेत.

अश्रू झाले अनावरपांडुरंग मूळचा हिंगोली जिल्यातील आहे. तो सध्या पुणे येथील सवित्रीबाई फुले विद्यापीठात एम ए चे शिक्षण घेत आहे. त्याने फिजिओथेरपीचा अभ्यासक्रम ही पूर्ण केला आहे. आठ वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने पोरका झालेल्या पांडुरंगाने जिद्द व चिकाटीच्या बळावर उच्च शिक्षण घेतले आहे. आज वाहकाने मारहाण करताना आईचा उच्चार करत अश्लील शिवीगाळ केल्याने त्याला अश्रू अनावर झाले होते. समाजात वावरताना अनेकदा बरे वाईट अनुभव येतात. मात्र, आज वाहकाने शिवीगाळ करीत मारहाण केल्याने त्याचे शब्द पांडुरंग च्या जिव्हारी लागले होते. त्याने आपल्या भावना व्यक्त करताच पोलिसांसह उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

कारवाईची मागणीएक अंध विद्यार्थ्याला वाहकाकडून मारहाण झाल्याची बातमी समजताच प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड चे कार्यकर्ते, उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक शीतल शिंदे, सचिन चिखले, माजी नगरसेवक अनंत कोराळे, खंडूदेव कोठारे, सचिन साकोरे, पंडित खुरंगळे, दत्तू खांबे, अशोक वाळुंज यांच्या सह अनेकांनी पीएमपी वाहकावर कारवाई करण्याची मागणी केली. प्रवासात अंध बांधवाना योग्य वागणूक व सन्मान द्यावा अशी मागणी या वेळी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे