शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत आलेली पीएमपी बस मिळणार भाडेतत्वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 17:16 IST

खासगी, शासकीय संस्थांसह औद्योगिक कंपन्यांचे कर्मचारी ने-आण करण्यासाठी होणार उपलब्ध 

पुणे : कोरोना संकटामुळे मागील तीन महिन्यांपासून ठप्प असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेवेला पुण्यात सेवा सुरू करण्यासाठी लवकर मान्यता मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने उत्पन्न मिळवण्यासाठी बस भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी, शासकीय संस्थांसह औद्योगिक कंपन्या कर्मचारी ने-आण करण्यासाठी बस देण्यात येणार आहेत. लवकरच त्याचे नव्याने दर निश्चित केले जाणार आहेत.लॉकडाऊनमध्ये सध्या केवळ अत्यावश्यक सेवा व पिंपरी चिंचवड मध्ये बस सेवा सुरू आहे. मात्र या सेवेलाही अल्प प्रतिसाद मिळत आहे. परिणामी मागील तीन महिन्यात सुमारे १५० कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. कर्मचाºयांचे वेतन देणेही प्रशासनाला शक्य होत नाही. सध्या दोन्ही पालिकांकडून मिळणाºया निधींवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाप्रमाणे माल वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रामुख्याने आयटी कंपन्यांना कर्मचारी वाहतुकीसाठी बस भाडे तत्वावर देण्याचे ठरविले. पण जादा दरामुळे काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आता दर कमी करून सर्वच संस्था, कंपन्यांना बस देण्याला संचालक मंडळाने नुकतीच तत्वत: मंजुरी दिली आहे. चाकण, हिंजवडी, भोसरी, चिंचवड यासह विविध भागांतील औद्योगिक कंपन्या, शासकीय व खासगी संस्था तसेच आयटी कंपन्याना लाँकडाऊन नियमावलीच्या अधीन राहून मासिक करारावर कंपनीचे कर्मचारी ने -आण करण्यासाठी बसेस देण्यात येणार आहेत. पूर्वी प्रतिमाह किमान दोन हजार किमी आकारणी आणि प्रतिकिमी ८३ रुपये ५० पैसे दराने बील आकारणी प्रमाणे बसेस देण्याचे नियोजन होते. परंतु हा दर जास्त असल्याने प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता महामंडळाचे उत्पन्न प्रतिकिमी जवळपास ५० रु असल्याने ५० ते ६० रुपये दराने बसेस भाड्याने देण्यात येणार आहेत. याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल, असे पीएमपी अधिकाºयांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलPoliceपोलिसNayana Gundeनयना गुंडेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस