शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पीएमपी बस धावणार आता ‘बायो सीएनजी’वर; स्वीडनबाहेरील पहिले शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 11:57 IST

शहरातील कचऱ्यापासून बायो सीएनजी निर्मिती करून त्याचा पुरवठा शहर बसला करणारे पुणे हे जगातील दुसरे शहर ठरणार आहे.

ठळक मुद्देकचऱ्यापासून तयार होतोय गॅसया गॅसचा वापर पीएमपीसाठी करण्याचा निर्णय चार-पाच वर्षांपूर्वीच२० ऑक्टोबरपासून पहिल्या टप्प्यात सुमारे ५० बस ‘बायो सीएनजी’ या इंधनावर धावणार निगडीत गॅस पंप सुरू केला जाणार; तीन महिन्यानंतर तिथूनच बसमध्ये बायोसीएनजीचा पुरवठा

पुणे : कचऱ्यापासून निर्मिती करण्यात आलेला ‘बायो सीएनजी’ या गॅसवर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस धावणार आहेत. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून तयार झालेल्या गॅसचा वापर बससाठी करणारे पुणे हे जगातील दुसरे ठरणार आहे. यापुर्वी स्वीडनमध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. दि. २० ऑक्टोबरपासून पहिल्या टप्प्यात सुमारे ५० बस या इंधनावर धावणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.       शहरातील प्रदुषण कमी करणे तसेच इंधन खर्चात बचत करण्यासाठी मागील काही वर्षांपासून ‘पीएमपी’च्या ताफ्यामध्ये सीएनजीवर धावणाऱ्या बसला प्राधान्य दिले जात आहे. आता त्यापुढे जात पीएमपी प्रशासनाकडून बायो सीएनजीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचा तळेगाव येथे कचरा निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पात हॉटेलमधील खाद्य पदार्थ व कचऱ्यापासून गॅस तयार केला जातो. या गॅसचा वापर पीएमपीसाठी करण्याचा निर्णय चार-पाच वर्षांपूर्वीच झाला आहे. त्यानुसार चाचण्याही घेण्यात आल्या. आता प्रत्यक्ष मार्गावर सीएनजी बसमध्ये बायोसीएनजी इंधनाचा वापर केला जाणार आहे.            निगडी येथे गॅस पंप सुरू केला जाणार असून तिथूनच तीन महिन्यानंतर बसमध्ये बायोसीएनजीचा पुरवठा केला जाईल. तर दि. २० ऑक्टोबर पासून पहिल्या टप्प्यात ५० बसमध्ये या इंधनाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी इंडियन ऑईल व एक खासगी संस्था सहकार्य करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.--------------शहरातील कचऱ्यापासून बायो सीएनजी निर्मिती करून त्याचा पुरवठा शहर बसला करणारे पुणे हे जगातील दुसरे शहर ठरणार आहे. पहिल्यांदा स्वीडनमध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.- राजेंद्र जगताप, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल