महापालिकेचे शिक्षक ‘कोरोना ड्युटी' मुक्त: दिवाळी सुट्टीनंतर शालेय कामकाज होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:23 PM2020-11-11T12:23:55+5:302020-11-11T12:24:20+5:30

गेल्या काही महिन्यांपासून पालिकेने शहरातील शिक्षकांना कोरोना ‘ड्युटी’वर नेमले होते.

PMC teacher 'Corona duty free': School work will resume after Diwali holiday | महापालिकेचे शिक्षक ‘कोरोना ड्युटी' मुक्त: दिवाळी सुट्टीनंतर शालेय कामकाज होणार सुरू

महापालिकेचे शिक्षक ‘कोरोना ड्युटी' मुक्त: दिवाळी सुट्टीनंतर शालेय कामकाज होणार सुरू

googlenewsNext

पुणे : कोरोनाच्या कामकाजासाठी नेमलेल्या शिक्षकांना या  ‘ड्युटी’मधून मुक्त करण्यात आले असून पुन्हा आपापल्या शाळांमध्ये पुर्ववत नेमणूका देण्यात आल्या आहेत. या शिक्षकांना दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे. मात्र ही सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या कामकाजात सहभागी होण्याचे आदेश अतिरीक्त आयुक्त (ज.) रुबल अगरवाल यांनी काढले आहेत. 

पुणे शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेला कोरोनासंबंधी कामांसाठी मनुष्यबळाची कमतरता भासू लागली होती. कोरोना नियंत्रण, विविध कोविड सेंटर, सर्वेक्षण आदी कामांकरिता बालवाडी शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स तसेच प्राथमिक विभागाच्या उप शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. पालिकेने तयार केलेल्या विविध पथकांमध्ये या शिक्षकांचा समावेश करण्यात आला होता. 

सध्या कोरोनाची साथ आटोक्यात आल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. घरोघर सर्वेक्षणाच्या २५ पेक्षा अधिक फेऱ्या झालेल्या असून रुग्णसंख्याही घटली आहे. राज्य शासनाने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरु करण्याचे संकेत दिल्याने पालिकेलाही शाळा सुरु करण्याची तयारी करावी लागणार आहे. शाळा सुरु झाल्यास शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना कोरोना ड्युटीमधून मुक्त करण्याची मागणी शिक्षण विभागाने केली होती.

Web Title: PMC teacher 'Corona duty free': School work will resume after Diwali holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.