PMC| पुण्याच्या महापौरांकडूनच पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 10:55 IST2022-02-09T10:53:48+5:302022-02-09T10:55:21+5:30
शिवसेनेकडून सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना वाद पेटला आहे...

PMC| पुण्याच्या महापौरांकडूनच पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पुणे : माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) हे शनिवारी पुणे महापालिकेत (Pune Muncipal Corporation) भेट देण्यासाठी आले असताना, त्यांना महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांमार्फत धक्काबुक्की झाली. ही बाब अत्यंत गंभीर असून, या प्रसंगामुळे पुणे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे़ असे पत्रच महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे़
महापौरांनी दिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, सोमय्या यांच्या दौऱ्याबाबत पुणे महापालिकेला माहिती देण्यात आली असतानाही योग्य सुरक्षा व्यवस्था का करण्यात आली नाही़ शनिवारी सुट्टीचा दिवस असताना देखील त्यावेळी उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांना पालिकेच्या आवारात प्रवेश कसा काय मिळावा अथवा तो कोणी दिला. याप्रकरणात सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या कुचराईबाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे लेखी खुलासा मागितला आहे.
तर याप्रकरणी भाजपच्यावतीने आज शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे़
महापालिकेच्या पायऱ्यांवरच होणार सोमय्या यांचा सत्कार-
येत्या शुक्रवारी महापालिकेच्या पायऱ्यांवरच सोमय्या यांचा शहर भाजपाच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना वाद पेटला आहे.