शहरं
Join us  
Trending Stories
1
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
2
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
3
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
4
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
5
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
6
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
7
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
8
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
9
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
10
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
11
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
12
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
13
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
14
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
15
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
16
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
17
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
19
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
20
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

PMC Elections: इच्छुकांचे आता होऊ दे खर्च;पालिका निवडणुकीसाठी इच्छुक अधिक जोमाने कामाला लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:33 IST

- प्रारूप मतदारयादी जाहीर झाली असून, त्यावर ३ डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मोकळा झाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आणि माजी नगरसेवक पुन्हा सक्रिय झाले असून, सर्वच पक्षांतील इच्छुक कामाला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष आता मेळावे आणि प्रभागातील ताकदवान उमेदवार कोण? हे ठरविण्यासाठी सर्वे करण्यावर भर देणार आहेत. इच्छुकही व्होटर बँकसाठी आता होऊ दे खर्च अशी भूमिका घेणार आहेत.

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर झाली. त्यानंतर प्रभाग रचनेवर ५ हजार ९२२ हरकती आणि सूचना आल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर प्रारूप आरक्षण सोडत आणि प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली. प्रारूप आरक्षण सोडतीवर २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत आहे. प्रारूप मतदारयादी जाहीर झाली असून, त्यावर ३ डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत आहे.

त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील प्रत्येक प्रभागातील इच्छुक तयारीला लागले आहेत पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याच्या संबंधित याचिकेमुळे इच्छुक धास्तावले होते पण या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याकडे इच्छुकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

इच्छुकांचे आता होऊ दे खर्च

मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीसह विविध ठिकाणी देवदर्शन सहली, हेलिकॉप्टरमधून राईड, महिलांना चारचाकी गाडीचे प्रशिक्षण आदी कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला आहे. काही प्रभागांमधील इच्छुकांच्या देवदर्शन यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यासाठी बसगाड्या, रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्वती भागातील एका इच्छुकाने चक्क प्रभागातील मतदारासाठी हेलिकॉप्टर राईडचे आयोजन केले आहे. त्यासाठी नाव नोंदणी सुरू केली आहे. आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे व्होट बँक तयार करण्यासाठी इच्छुकांकडून अनेक फंडे वापरण्यात येत आहेत. त्यामुळे आता होऊ दे खर्च अशी भूमिका असणार आहे.

पुणे महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेत ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे. ज्या ठिकाणी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्या २० जिल्हा परिषद आणि २ महापालिकांमध्ये नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. पण पुणे महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण ४३ टक्के देण्यात आले आहे. त्यामुळे पुणे महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेबाबत हा मुद्दा उपस्थित होत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Elections: Candidates Gear Up, Ready to Spend Big

Web Summary : With elections cleared, Pune's aspiring PMC candidates are actively engaging voters. Expect increased spending on voter engagement activities like trips and events as candidates vie for votes. Pune follows reservation rules.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक